Breaking News

*कन्हान ला शहिद प्रकाश देशमुख यांना दिली श्रद्धांजलि* *कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*

*कन्हान ला शहिद प्रकाश देशमुख यांना दिली श्रद्धांजलि*

*कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान शहर विकास मंच द्वारे शहिद प्रकाश देशमुख यांचा २३ व्या स्मृति दिवस निमित्य श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रायभाण देशमुख , लीलाबाई देशमुख , प्रदीप देशमुख यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख यांचा प्रतिमेला पुष्प हार अर्पण व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन शहिद प्रकाश देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
११ फेब्रुवारी १९९९ मध्ये जम्मु कश्मीर येथे झालेल्या कारगील युद्धा मध्ये दहशतवादी यांचाशी लढतांनी कन्हान येथील जवान प्रकाश देशमुख शहिद झाले होते . शुक्रवार दिनांक ११ फ्रेबुवारी २०२२ ला शहिद प्रकाश देशमुख यांच्या २३ व्या स्मृति दिवस निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रायभाण देशमुख , लीलाबाई देशमुख , प्रदीप देशमुख यांच्या हस्ते शहिद प्रकाश देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी व नागरिकांनी शहिद प्रकाश देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन शहिद प्रकाश देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , हर्ष पाटील , शाहरुख खान , हर्षल आकरे , प्रकाश कुर्वे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …