*कन्हान येथुन अशोक मोहीते हरविला आहे* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला हरविल्याची तक्रार दाखल*

*कन्हान येथुन अशोक मोहीते हरविला आहे*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला हरविल्याची तक्रार दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कळमना नागपुर येथुन तिघे जण बांगडया विक्री करिता आले असतांना सायंकाळी दोघे जण परत आंबेडकर चौक येथे परत आले परंतु अशोक गणेश मोहीते न आल्याने नागपुर ला त्याच्या घरी पाहीले तसेच आजुबाजुला सगळी कडे शोधले असता मिळुन न आल्याने फिर्यादी अनिल सोनोने हयानी अशोक मोहीत कन्हान येथुन हरविल्याची तक्रार दाखल केली आहे.
शुक्रवार दिनांक.४ फेब्रुवारी ला १) अनिल बाबाराव सोनोने वय ३३ वर्ष २) अशोक गणेश मोहीते वय ४० वर्ष व ३) विश्राम रतन जाधव वय ३५ वर्ष, सर्व राहणार. बाजार गाव पांजरा, नागपुर ह.मु कळमणा नगर, रेल्वे क्रासींग जवळ नागपुर हे तिघेही ऑटोने कन्हान येथे सकाळी ८ वाजता आले. आणि तिघेही वेगवेगळया मार्गाने बांगडया विकण्या करिता गेले. सायंकाळी ५ वाजता दोघे जण आंबेडकर चौक कन्हान येथे आले. अशोक ची वाट पाहुन थकल्यावर कळमणा नागपुर च्या त्याच्या घरी विचारपुस केली. तो आला नव्हता. दोन तीन दिवस कन्हान, कामठी, नागपुर सगळी कडे त्या शोध घेतला परंतु तो मिळुन न आल्याने फिर्यादी अनिल बाबाराव सोनोने हयानी कन्हान पोलीस स्टेशन गाठुन अशोक मोहीत हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. त्याचे वर्णन – अशोक गणेश मोहीते वय ४० वर्ष, सावळा रंग, उंची ५ फुट ५ इंच, कथ्था पँंट, निळया रंगाचा चेक चा सर्ट घातलेला असुन लांब मिशी, उजव्या हाताच्या दंडावर हनुमान व विंचु गोंदलेला असुन प्लास्टिक ची चप्पल घातली आहे. अश्या वर्णनाचा व्यकती कुणालाही आढळल्यास त्यानी कन्हान पोलीस स्टेशन ला संपर्क साधुन कळवावे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …