*मंत्री आदित्य ठाकरे आज नागपुर जिल्हा दौऱ्यावर*
*नांदगांव येथे भेट व पाहणी करुण अधिकार्यांशी चर्चा करणार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – राज्याचे पर्यटन , पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री श्री आदित्य ठाकरे हे आज नागपुर दौऱ्यावर येत आहे .
सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ ला सकाळी १०:३० वाजता नागपुर वरुन मोटारीने नांदगांव कडे प्रयाण करणार आहे . सकाळी ११:१५ वाजता नांदगांव येथे भेट व पाहणी करुण अधिकार्यांशी चर्चा करणार आहेत . त्यानंतर १२:०० वाजता मोटारीने नागपुर कडे प्रयाण करणार असुन २:०० वाजता नागपुर जिल्ह्याची पर्यटक विषयक चर्चा करण्यासाठी अधिकार्यांशी बैठक होणार असुन २:४५ वाजता नागपुर विभागातील माझी वंसुधरा अभियानाची आढावा बैठक घेणार आहे . सायंकाळी ६:०० वाजता नागपुर उड्डान क्लब चे उद्घाटन होणार असुन रात्री ८:३० वाजता खाजगी विमानाने मुंबई कडे प्रयाण करणार आहे .
सदर दौऱ्यावर सर्व शिवसैनिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे कडकडीचे आव्हाहन शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , शहर प्रमुख छोटु राणे , महिला शहर प्रमुख मनिषा चिखले नगरसेवक अनिल ठाकरे , नगरसेविका मौनिका पौणिकर , सह आदि ने केले आहे .