Breaking News

*मोवाड येथे भव्य शोभायात्रा व गजानन महाराज प्राणप्रतिष्ठा महोत्सव*

*मोवाड येथे भव्य शोभायात्रा व गजानन महाराज प्राणप्रतिष्ठा महोत्सव*

नरखेड प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे

मोवाड – मोवाड शहरात गजानन महाराज प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडली. विठ्ठल मंदीर नवीन वस्ती येथून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ती शोभायात्रा संपूर्ण मोवाड शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करून जुनी वस्ती येथे समारोप झाला. त्यानंतर गजानन महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.


दोन वर्ष कोरोना महामारी नंतर प्रथमच मोवाड येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील व लगतच्या दिंडी पथक , बँड पथक यानी सहभाग घेतला होता. तर त्याच प्रमाने शहरातील नागरिकांनी या मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. शहरातील मुख्य रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ,बाजार चौक या ठिकाणी दिंडी , बँड पथक व शोभायात्रेतील नागरिकांनसाठी चहा , पाणी व नस्त्याची व्यवस्था कराण्यात आली होती. संपूर्ण मोवाड शहर भक्तीयम वातावरणात रंगून गेले होते. दोन वर्षानंतर पहिल्यांदा निघालेल्या शोभायात्रेचा नागरिकांनी मोठा आनंद घेतला. रस्त्यावर पाणी मारून रांगोळी काढण्यात आली होती. तर युवकांनी मोठ्या प्रमाणात फुगड्या खेळणे , दिंडी नाचण्याचा मोह आवरता आला नाही.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …