खाजगी रूग्णालयाला नियम धाब्यावर बसवुन नाहकरत प्रमाणपञ दिल्या प्रकरणी
सिरोंचा प्रतिनिधी -तिरुपती चिटयाला
सिरोंचा नगर पंचायत अंर्तगत सुरू असलेल्या कामांना नगर पंचायतचे उपाध्यक्ष स्वःताहुन एखादं महत्वपूर्ण कामाचे नाहरकत प्रमाणपत्र देत असेल त्याचे रितसर सांबांधित विभागाकडे तक्रार दाखल झाली तर त्या नगरसेवकाला किंवा उपाध्यक्षाला सहा वर्षापर्यंत निवडणुक लढविता येवु शकत नाही ? असे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी देऊ शकतात…
अधिनियम
सिरोंचा नगर पंचायत मधील सर्व नगर सेवकांना माझी विनंती आहे की अशी चुक करून निवडणुकीतुन सहा वर्ष तुम्ही दूर जावु नका.. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा सहा वर्षे बंधन म्हणजे तब्बल तीन निवडणुका होय! हे लक्षात ठेवा…
गरीब व्यक्तीच्या विकासासाठी तुम्ही सर्वांनी काम करा पण श्रीमंत लोकांच्या कामासाठी नगर पंचायत चे नियम धाब्यावरून बसवुन काम करू नका… हे एक ना एक दिवस एका मुळे तुमच्या सर्वांवर अंगलट येईल…
*गरीब असो की श्रीमंत नियम एकच असतात*
*एखादं साधा रहिवासी दाखल्यांसाठी सर्व सामान्य नागरिकांना एकेक आठवडा भर फिरवून घेणाऱ्यांनी एखाद खाजगी संस्थेला नाहरकत प्रमाणपत्र तासाभरात मिळून जातात ? हे खरंच इथे विचार करण्यालायखीच वाटतं…*
माजी आमदाराच्या दबावात नियम धाब्यावर बसवून काम होत असेल तर चुकीचे
नगर पंचायत अंर्तगत नगरसेवक मनमानी करून काम करीत असेल आणि कुणी आम्हाला विचारणारा नाही तक्रार करण्याची दमक सिरोच्यांत कोणात नाही असा विचार करीत असेल तर हे साफ चुकीचे आहेत…नियम धाब्यावर बसवून जर एखाद बाहेर राज्यातील संस्थेला चिरीमिरी घेऊन नाहरकत प्रमाणपत्र देत असेल तर या विरुद्ध आमच्या सारख्यांना तक्रार घेऊन मुंबई गाठणे काही अडचणीचे नाहीत नियम धाब्यावर ठेवुन काम करणार्यांनी तात्काळ अहे कु्त्य थांबवावे अशी मागणी सिरोंचा वासीयांनी केली आहे.