*कन्हान येथे पुलवामा दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना दिली श्रद्धांजलि*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – १४ फेब्रुवारी २०१९ ला
जम्मूच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे झालेल्या दहशतवादी हल्याला तीन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी तारसा रोड शहिद चौक येथे शहिद स्मारकावर पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित केली .
इ.स.वी. सन १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गा वर भारतीय सुरक्षा जवानांना घेऊन जाणाऱ्या CRPF च्या वाहनांच्या ताफ्यावर आत्मघाती हल्ला झाला होता . या हल्यात ४० ते ४५ भरतीय सुरक्षा जवान शहीद झाले होते .
सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी २०२२ ला या आत्मघाती हल्ल्याला तीन वर्ष पुर्ण झाल्याने कन्हान येथे शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन तारसा रोड शहिद चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे यांच्या हस्ते शहिद स्मारकावर पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी शहिद स्मारकावर पुष्प अर्पित करुन तसेच दोन मिनटाचा मौन धारण करुन पुलवामा दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली .

या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , उपाध्यक्ष महेंद्र साबरे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , संदीप कभे , शिवपाल सोनी , मोक्षभाऊ , सोहेलभाऊ
सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज