*कन्हान येथे राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे भव्य स्वागत*

*शिवसेना पदाधिकार्यांनी विविध समस्या बाबत निवेदन देऊन तात्काळ सोडविण्याची केली मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सोमवार ला कन्हान परिसरातील नांदगाव बखारी येथे राख विसर्जन प्रकल्पा ला भेट व पाहणी करण्याकरिता जात असतांना कन्हान शहरातील तारसा चौक येथे मंत्री आदित्य ठाकरे यांचे शिवसेना पदाधिकार्यांनी उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात पुष्प गुच्छ देऊन भव्य स्वागत केले व शहरातील विविध समस्या बाबत चे निवेदन देऊन तात्काळ सोडविण्याची मागणी केली आहे .

निवेदनात सांगितले कि कन्हान – पिपरी नगरपरिषद मध्ये स्थाई मुख्याधिकारी नसल्याने शहरातील विकास कामे रखळलेली असुन तात्काळ स्थाई मुख्याधिकारी नियुक्ती करावे . कन्हान येथील बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योग स्थापित करण्यासाठी एमआयडीसी करिता जागा उपलब्ध करून देणे , कन्हान पोलीस स्टेशन साठी उपलब्ध केलेल्या जागेवर पोलीस स्टेशन ची नवीन ईमारत व पोलीस क्वार्टर्ससाठी तात्काळ निधी उपलब्ध करून देणे अश्या सह अनेक विविध समस्या बाबत चे निवेदन शिवसेना पदाधिकार्यांनी उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात मंत्री आदित्य ठाकरे यांना देऊन तात्काळ सोडविण्याची मागणी केली आहे .

या प्रसंगी खासदार कृपाल तुमाने , आमदार आशिष जयस्वाल , राजु भोस्कर , नप नगराध्यक्षा करूणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक अनिल ठाकरे , नगरसेविका मौनिका पौणिकर , शहर प्रमुख छोटु राणे , चिंटु वाकुडकर , समशेर पुरवले , अजय चव्हान , हरीष तिडके , शुभम येलमुले , मनीषा चिखले , शुभांगी घोघले , लता लुंढेरे , वैशाली खंडार , माया साकोरे , माया नामदेवे , मंजुषा ताई , मिना ताई , नितु तिवारी , वैशाली श्रीखंडे , कोमल लांजेवार , सह आदि शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Maharashtra News Media सच की आवाज