Breaking News

*कन्हान ला १९ फेब्रुवारी पासुन भव्य क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन* *जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था तर्फे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चे आयोजन*

*कन्हान ला १९ फेब्रुवारी पासुन भव्य क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन*

*जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था तर्फे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चे आयोजन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य
जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था कन्हान तर्फे तमाम क्रिकेट प्रेमीनसाठी भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट आयोजन करण्यात आले आहे .


शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९२ व्या जयंती निमित्य जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था कन्हान तर्फे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल टूर्नामेंट चे आयोजन तेजाब ग्राउंड पोलीस स्टेशन च्या मागे करण्यात आले असुन या भव्य क्रिकेट टूर्नामेंट चा शुभारंभ दिनांक १९ ला रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार मां.श्री कृपाल तुमाने व सामाजिक कार्यकर्ता रामेश्वरजी बावनकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे . या भव्य क्रिकेट टूर्नामेंट मध्ये प्रथम बक्षीस ५१,००० रुपए आणि सन्मान चिन्ह रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते व द्वित्तीय बक्षीस २५,००० रुपए आणि सन्मान चिन्ह , कन्हान नवरात्र गरबा महोत्सव यांच्या हस्ते वाटप होणार असुन बेस्ट बैट्समैन , बेस्ट बॉलर , हैट्रिक , मैन ऑफ द मैच मान्यवरांचा हस्ते वाटप होणार आहे . या भव्य क्रिकेट टूर्नामेंट मध्ये प्रमुख अतिथि म्हणून कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , तहसीलदार प्रशांत सांगडे , पोलीस निरीक्षक विलास काळे , शुभांगी घोघले , मनिषा चिखले , महावीरजी खंगारे , डॉ मित्रा हे उपस्थित राहणार असुन या भव्य क्रिकेट टूर्नामेंट मध्ये जास्तीत जास्त क्रिकेट संघा ने सहभागी होऊन आकर्षित बक्षीस जिंकावे असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ता वर्धराज पिल्ले यांनी क्रिकेट प्रेमींना केले आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …