Breaking News

*कन्हान येथे शिव भोजन थाली चे शुभारंभ* *गरीब , गरजु व मजदूर लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा – बर्वे*

*कन्हान येथे शिव भोजन थाली चे शुभारंभ*

*गरीब , गरजु व मजदूर लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा – बर्वे*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्र राज्य शासन ने गरीब, मजदूर, गरजु नागरिका करिता सवलतीच्या दारात शिवभोजन उपलब्ध करुन देणारी शिव भोजन योजना संपुर्ण राज्या मध्ये दिनांक.२६ जानेवारी २०२० पासुन लागु केल्याने कन्हान येथे काॅंग्रेस कमेटी महिला आघाड़ी कन्हान शहर अध्यक्ष रिता बर्वे यांच्या हस्ते शिव भोजन थाली चे शुभारंभ करण्यात आले.
देशात कोरोना सारखी घातक महामारी बीमारी पसरल्याने शासना ने लाॅकडाऊन लावल्याने गोर, गरीब, मजदूर, हात मजुरी सहित संपुर्ण नागरिकान वर भुखमारी ची वेळ आल्याने राज्य शासनाने वर्ष २०२० पासुन संपुर्ण राज्यात शिव भोजन थाली योजना लागू केल्याने कन्हान येथे पोलीस स्टेशन च्या बाजुला गांधी चौक येथे शिव भोजन थाली प्रतिष्ठान सिद्धांत शिरपुरकर यांच्या द्वारे सुरु करण्यात आले असुन शुक्रवार दिनांक.१८ फेब्रुवारी रोजी शिव भोजन थाली चे शुभारंभ काॅंग्रेस कमेटी शहर महिला आघाडी अध्यक्ष रिता बर्वे यांच्या हस्ते व कांद्री ग्रामपंचायत उपसरपंच श्यामकुमार ऊर्फ बबलु बर्वे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले .


या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद माजी उपाध्यक्ष व नगरसेवक योगेंन्द्र रंगारी, नगरसेविका रेखा टोहणे, गुंफा तिडके, सदरे आलम, युवक काॅंग्रेस आकिब सिद्धिकी, अजय कापसीकर, सोहैल सैय्यद, आतिश गायकवाड, अरुण शेंडे, अनस शेख, शांतानु राऊत आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …