Breaking News

*गुडेगाव येथे शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न*

*गुडेगाव येथे शिवजयंतीचा कार्यक्रम संपन्न*

रामटेक –  दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी 393 व्या शिवजयंतीच्या निमित्ताने, गुडेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प, तालुका रामटेक व छत्रपती युवा संघ, गुडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली, प्रबोधन व शिवभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा शिवभक्त धिरज मंदेवार यांनी केले तर प्रास्ताविक दुर्योधन बगमारे यांनी केले. तालुका रामटेक येथील समतादूत राजेश राठोड यांनी शिवचरित्र या विषयावर प्रबोधन केले.युवकांनी जाणत्या राजाचा एका तरी गुण अंगीकारावा असे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजय गद्रे होते.याप्रसंगी उपसरपंच प्रदीप वरखेडे, पोलिस पाटील महेश सलामे,कोतवाल शरद सलामे,विजय मंदेवार, ओमप्रकाश डोले, रविंद्र तुरणकर व अन्य प्रतिष्ठीत नागरिक व शिवभक्त युवक,युवती उपस्थित होते.

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …