*भिलेवाडा येथे पहिल्यांदाच शिव जयंतीनिमित्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न*
रामटेक – दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी 393 व्या शिवजयंतीच्या निमित्ताने, भिलेवाडा येथेडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत समतादूत प्रकल्प, तालुका रामटेक व श्रीराम युवा संघ, भिलेवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली, प्रबोधन व शिवभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा शिवभक्त कुणाल बावणे यानी केले. कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानि ओमप्रकाश डोले समतादूत मौदा तर प्रमुख पाहुणे प्रवेश खडसे उपस्थित होते.निखील डोले, राहुल कडसकर ,तेजस निमरड मयुर खडसे सुरज खडसे अंकित निखील चौधरीअन्य प्रतिष्ठीत नागरिक व शिवभक्त युवक,युवती उपस्थित होते.