Breaking News

*गुड्डीगुडम जवळ बसची झाडाला धडक*-25 प्रवाशी जखमी

*गुड्डीगुडम जवळ बसची झाडाला धडक*


अहेरी कडून सिरोंचा कडे जात होती बस
25 प्रवाशी जखमी
गुड्डीगुडम गावाजवळील घटना

सिरोंचा प्रतिनिधि-तिरुपती चिटयाला


अहेरी आगाराची बस प्रवाशी घेऊन अहेरी कडून सिरोंचा कडे जात असताना गुड्डीगुडम गावाजवळील आश्रम शाळेचा वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात बसमधील 25 प्रवाशी जखमी झाल्याची घटना आज दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अहेरी-सिरोंचा महामार्गावरील गुड्डीगुडम गावाजवळ घडली.


प्राप्त माहिती नुसार अहेरी आगाराची बस क्रमांक एम,एच,40 एक्यु-6121 हि बस दुपारचा सुमारास अहेरी येथून प्रवाशी घेऊन सिरोंचाकडे जात होती.दरम्यान अहेरी-सिरोंचा महामार्गावरील गुड्डीगुडम गावाजवळ बस चालकांचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसची आश्रम शाळा जवळ रस्त्याचा बाजूला असलेल्या झाडाला जबर धडक दिली.या बसमधील 20 ते 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.या धडकेत बसची समोरील भाग पूर्णतः क्षतीग्रस्त झाली असून यामध्ये महाराष्ट्र परिवहन विभागाचे मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती गुड्डीगुडम गावातील नागरिकांना माहिती मिळताच अपघात झालेल्या बसकडे धाव घेऊन बसमधील जखमी प्रवाश्याना मिळेल त्या वाहनाने अहेरी येथील उप जिल्हा रुग्णालयाला पाठवले असून किरकोळ जखमींना येथे उपचार सुरु असून गंभीर जखमीना पुढे गडचिरोली आणि चंद्रपूर ले हलविले आहेत.वृत्त लिहेपर्यंत जाखीमचं नाव काढले नाहीत.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …