*कन्हान – पिपरी नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना तात्काळ वाटप करा – प्रकाश भाऊ जाधव*
*माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात नागरिकांचा मुख्याधिकारी ला घेराव*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – केंन्द्र व राज्य शासनाने सन २०२२ मार्च पर्यंत सर्व बेघर कुटुंबाना घरे देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असुन कन्हान-पिपरी नगरपरिषद प्रशासनाने या मोहीम कडे दुर्लक्ष करून नागरिका पर्यंत न पोहोचविल्याने माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी मुख्याधिकारी चा घेराव करित तात्काळ गोर गरिब नागरिकांना पट्टे वाटप करण्याची मागणी केली आहे.
कन्हान-पिपरी नगरपरिषद क्षेत्र हे मोठ्या लोक वस्तीच क्षेत्र असुन या परिसरातील धरम नगर, पिपरी, ढिवरपुरा पिपरी, मस्जिद, आनंद नगर, रेल्वे स्टेशन रोड, सिहोरा, एमजी नगर, सत्रापुर आणि इतर भागात अनेक वर्षापासुन गरीब लोक शासनाच्या व इतरजागी अतिक्रमण करून राहत आहे. या सर्व गोर गरिबांना असलेल्या जागी किंवा अडचणी आल्यास पर्यायी जागेची व्यवस्था करून जमिनीच्या हक्काचे मालकी पट्टे देण्यात यावे. या करिता शासनाने २०२२ मार्च पर्यंत आदेश जारी केला असुन नगरपरिषद प्रशासना ने या कार्याकडे दुर्लक्ष करून नागरिकां मध्ये जन जागृती केली नाही. गोरगरिबा पर्यंत माहिती पोहोचली नाही. जागा ठरवणे, मोजणे, पट्टे धारकाचे कागदपत्रे गोळा करणे, पर्यायी जागा मिळवणे. अश्या अनेक कार्य नगरपरिषद प्रशासनाने केलेली नसुन नागरिकां शी बेईमानी केल्याने माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी मुख्याधिकारी संदीप बोरकर यांना भेटुन चर्चा करून निवेदन देत तात्काळ गोर गरिबांना पट्टे वाटप करण्याची मागणी केली आहे.
या प्रसंगी माजी खासदार प्रकाश जाधव , दिलीप राईकवार , किशोर पांजरे , प्रविण गोडे , सचिन साळवी , पत्रकार कमलसिंह यादव , युवा पत्रकार ॠषभ बावनकर , अशोक पाटील , नरेश सोनेकर , सुरेश चावके , गौरव भोयर , निशांत जाधव , रूपेश सातपुते , बंटी हेटे सह नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.