Breaking News

*पिपळा गावातील नागरिकांना घरकुल देण्याची मागणी* *प्रहार विद्यार्थी संघटनेचे खंड विकास अधिकार्यांना निवेदन*

*पिपळा गावातील नागरिकांना घरकुल देण्याची मागणी*

*प्रहार विद्यार्थी संघटनेचे खंड विकास अधिकार्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – पारशिवनी तालुक्यातील पिपळा गावातील नागरिकांना केंद्र सरकार द्वारे काढण्यात आलेल्या घरकुल योजनेच लाभ आता पर्यंत न मिळाल्याने प्रहार विद्यार्थी संघटने च्या पदाधिकार्यांनी खंड विकास अधिकारी यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ पिपळा गावातील नागरिकांना घरकुल देण्याची मागणी केली आहे
केंद्र सरकार ने गोर गरीब सारख्या नागरिकान करिता पक्के घर बांधकामा करिता घरकुल योजना काढली असुन संबंधित अधिकार्यांचा दुर्लक्षते मुळे ही योजना नागरिकां च्या घरा पर्यंत पोहोचलेली नाही आहे .
पारशिवनी तालुक्यातील पिपळा गावातील रीतसर चौकशी करून यादीत समाविष्ट असलेल्या गरजु गरीब नागरिकांना त्वरीत लाभ मिळण्याचा मागणी करिता प्रहार विद्यार्थी संघटने च्या पदाधिकार्यांनी खंड विकास अधिकारी यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तात्काळ पिपळा गावातील नागरिकांना घरकुल देण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी पारशिवनी शहर अध्यक्ष तुषार सोनटक्के , आकाश मेश्राम , राकेश दुधुके , लोकेश शिवारे , अंकुश दुधुके , फिरोज दुधुके , श्याम मेश्राम , विष्णु वानखेडे सह आदि पदाधिकारी उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …