Breaking News

*मोठी बातमी* *कन्हान पोलीसांनी अवैध गौ तस्करी च्या वाहनांना पकडुन ५७ बैल, १२ गाय व २३ गोऱ्यांना दिले जीवनदान* *कारवाई दरम्यान दोन ट्रक , एक पिकअप वाहन पकडुन ५३ लाख ५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त , ४ आरोपी अटक*

*मोठी बातमी*

*कन्हान पोलीसांनी अवैध गौ तस्करी च्या वाहनांना पकडुन ५७ बैल, १२ गाय व २३ गोऱ्यांना दिले जीवनदान*

*कारवाई दरम्यान दोन ट्रक , एक पिकअप वाहन पकडुन ५३ लाख ५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त , ४ आरोपी अटक*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस १३ किलो मीटर अंतरावर असलेल्या डुमरी शिवारात कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे हे आपल्या कर्मचाऱ्या सह पेट्रोलिंग करीत असतांना मिळालेल्या गुप्त माहिती वरून पेट्रोल पंप च्या समोरील शेतात जाणाऱ्या रस्त्या जवळील नहराजवळ शेतात गाय व बैलांना चाऱ्यापाण्याची कोणतीही सोय न करता बांधुन ठेऊन दोन ट्रक, एक पिकअप वाहनात अवैध रित्या वाहतुक करण्याऱ्या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळुन दोन ट्रक व एक पिकअप वाहना सह ५३ लाख ५ हजार रूपयां चा मुद्देमाल कन्हान पोलीसांनी पकडुन ५७ बैल, १२ गाय, २३ गोरे असे ९२ गौवंश जनावरांना जीवनदान देऊन कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस सुत्राकडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक.२१ फेब्रुवारी ला रात्री ११:३० ते मंगळवार दिनांक.२२ फेब्रुवारी २०२२ ला दुपारी १२:३० वाजता दरम्यान कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे हे आपल्या कर्मचाऱ्यासह सरकारी वाहनाने पोस्टे परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना मुखबीर द्वारे गुप्त माहिती मिळाल्याने नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गावरील मौजा डुमरी शिवारात पेट्रोल पंप च्या समोरील बाजुने शेतात जाणाऱ्या रस्त्याच्या जवळील नहरा जवळ एका शेतामध्ये गायी, बैलांना चाऱ्यापाण्याची कोणतीही सोय न करता बांधुन ठेवलेले असुन गायी व बैलांची वाहनाने अवैध रित्या वाहतुक करण्याकरिता घटनास्थळा वर दोन ट्रक व एक पिकअप वाहन असल्याने कन्हान पोलीसांनी दोन पंचासह घटनास्थळी पोहचुन पाहणी केली असता टाटा कंपनीचा दहाचाकी ट्रक क्रमांक. एम एच २८ बी ८६७१ मध्ये २१ बैलांना कोंबुन त्यांचे पाय व तोंड बांधुन चाऱ्यापाण्याची कोणतीही सोय न करता निर्दयतेने व क्रुरपणे कत्तलीकरिता ट्रक मध्ये भरलेले दिसुन आल्याने कन्हान पोलीसांनी गोवंश बाबत आरोपीस विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी सोबत शाब्दिक वाद करून हाताने ढकलुन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने कन्हान पोलीसांनी घटनास्थळावर पंचनामा करून १) दहा चाकी ट्रक क्रमांक एम एच २८ बी ८६७१ मध्ये २१ बैल क्रुरतेने कोबुन ठेवलेले ट्रक किंमत २० लाख रुपये, बैल प्रती १०,००० रुपये प्रमाणे २१ बैल किंमत २,१०,००० रुपये २) दहा चाकी ट्रक क्रमांक. एम एच ४० सीबी २२०२ किंमत २० लाख रुपये ३) टाटा योद्धा पिकअप वाहन क्रमांक. एम एच बी एल ६२२५ किंमत ५ लाख रुपये ४) दोरीने बांधलेले ३६ बैल प्रती बैल किंमत १०,००० रुपये प्रमाणे ३,६०,००० रुपये ५) दोरीने बांधलेल्या १२ गायी प्रति गाय १०,००० रुपये प्रमाणे १,२०,००० रुपये ६) दोरीने बांधलेले २३ गोरे प्रति गोरा किंमत ५,००० रुपये प्रमाणे १,१५,००० असा एकुण ५३,०५,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून गौवंश जनावरे वाहनात भरून देवलापार व लाखणी येथील गौरक्षण मध्ये जनावरे दाखल करून ९२ गौवंश जनावरांना जिवनदान दिले.


सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी सरकार तर्फे फिर्यादी शरद रविंन्द्र गिते वय ३४ वर्ष पोस्टे कन्हान यांच्या तोंडी रिपोर्ट वरून आरोपी १) मोहम्मद अनिस अब्दुल कुरैशी वय ३२ वर्ष राहणार कामठी, २) शेख सलमान शेख बशीर वय ३० वर्ष राहणार कामठी, ३) रशिद वल्द ब्रदुजमा बेग वय ३१ वर्ष राहणार नागपुर, ४) जेहुर महरूम साहीब खान वय ३१ वर्ष राहणार नागपुर अश्या चार आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचा विरुद्ध अपराध क्रमांक ७४/ २०२२ कलम ३५३, ३४ भादंवि सह कलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ कलम ५ (अ)(१), ५ (ब)९ सह प्राणी छळ प्रती अधिनियम ११ (१)(ड), ५ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.


सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विजयकुमार मंगर, अपर पोलीसअधिक्षक राहुल माखणीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे , उपनिरीक्षक महादेव सुरजुसे , राहुल रंगारी , शरद गिते, मंगेश सोनटक्के , नवीन पाटील, वैभव वरीपले सह आदि पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …