*कन्हान येथे संत गाडगे बाबा यांची जयंती थाटात साजरी*
*कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान येथे शहर विकास मंच द्वारे संत गाडगे बाबा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच नवनिर्वाचित सदस्य अनुराग महल्ले व कृणाल तिलवार यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली.
बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी ला संत गाडगे बाबा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मंच नवनिर्वाचित सदस्य अनुराग महल्ले व कृणाल तिलवार यांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित मंच मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे यांनी संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत संत गाडगे बाबा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , सचिव हरीओम प्रकाश नारायण , सहसचिव सुरज वरखडे , कोषाध्यक्ष महेश शेंडे , मार्गदर्शक भरत सावळे , प्रभाकर रुंघे , प्रकाश कुर्वे , सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज