*महानिर्मिति कंपनी ऊर्जा विभाग मधल्या प्रकल्प ग्रस्तांना न्याय देण्याची मागणी*
*युवासेना उप शहर प्रमुख आकाश ठाकरे यांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – महानिर्मिति कंपनी ऊर्जा विभाग मधल्या प्रकल्प ग्रस्तांना न्याय देण्याची मागणी युवासेना उप शहर प्रमुख आकाश ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे .
निवेदनात सांगितले आहे कि
गोरगरीबांची महानिर्मिति कडून फसवनुक झाली असुन नागरिक कास्ताकार शेतिवार अवलंबुन होते . आता महानिर्मितिनी आमचा शेती घेऊंन ( प्रशिक्षण) नावा खाली वर्षानि वर्ष काम करुण घेत आहे मात्र आता पर्यंत यानी नागरिकांना कायम स्वरूपी समावुन घेतलेले नसुन शेती घेतांनी म्हंटल होते कि एक वर्ष प्रशिक्षण देउन डायरेक्ट तंत्रज्ञ 3 म्हणून समजवुन घेउन परंतु आता स्पर्धा पेपर ची अट टाकुन वर्षो नी वर्षा ट्रेनिंग देते आहेत मात्र १४०००/१५०००। रुपए प्रति माह देऊन इतक्या माहगाई मध्ये आम्ही १४०००-१५००० पगारा मधे आमच्या परिवाराच कस पालन पोषण करायचं आम्ही शेती या करीता दिल्या की आमच्या गावातल्या बेरोजगारांनां रोजगार मिळावा पण असे काही झाले नाही .
औष्णिक विद्युत केन्द्र चंन्द्रपुर येथील प्रकल्पग्रतानी आपले न्याय हक्कासाठी चेमनीवरती २२० मीटर वर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत असतांना मा.मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी हस्तक्षेप करून सुद्धा उर्जा विभागणी या विषयाचे दखल घेतला नाही . आमच्या गावातील जमिनी संपादन केली असून बहुतांशी शेती हि डाँम मध्ये गेली असून या गावातील लोकांचे रोजगार हिरावून घेण्यात आला आहे . त्यामूळे गावातील नवीन पिडी बेरोजगार आहे . तरी त्यांना डाँम वर कत्रांटी कामगार म्हणून कामावर घेण्यात यावे व आम्हा प्रकल्पग्रस्तांना लवकर न्याय मिळेल अशी मागणी युवासेना उप शहर प्रमुख आकाश ठाकरे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना निवेदन देऊन केली आहे .