*कन्हान परिसरात संत गाडगे बाबा यांची १४६ वी जयंती थाटात साजरी*
*विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान परिसरात विविध संघटने द्वारे ठिकठिकाणी संत गाडगे बाबा यांच्या १४६ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
*सार्वजनिक वाचनालय , कन्हान*
सार्वजनिक वाचनालय हनुमान नगर कन्हान येथे संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव चिकटे यांच्या हस्ते व गंगाधरराव अवचट , यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रवि राणे , दिनकरजी मस्के यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व सभासदांनी व नागरिकांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला अर्पित करुन विनम्र अभिवादन केले व फळ आणि प्रसाद वितरण करुन संत गाडगे बाबा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी चेतन ठाकरे , मेघना गिर्हे , आकाश गिरडकर , रोशन तांडेकर , शुभम कावळे , नितिन मोहणे , सुरेंद्र नेवारे , हर्षल नागपुरे , उदय पाटील , सुरज जांडेकर , आशिष घोरपडे , शुभम शेंडे , विक्की कनोजे , अल्का कोल्हे , प्राची गिऱ्हे , मिलींद वाघधरे , राहुल पारधी , रवि वानखेडे , अभिषेक निमजे , पुष्पा बर्लेवार , मयुरी गिऱ्हे , कुमार अर्थव गिऱ्हे सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्याम बारई ग्रंथपाल यांनी केले तर आभार मनोहर एम कोल्हे यांनी मानले .
*एम जी एस संघटन कन्हान*
एम जी एस संघटन कन्हान द्वारे संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे आयोजन गांधी चौक येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित अध्यक्ष गणेश भालेकर , यांच्या हस्ते व दिपचंद शेंडे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित उपाध्यक्ष समशेर पुरवले , दिपचंद शेंडे यांनी संत गाडगे बाबा यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी एम जी एस संघटन कन्हान शहर अध्यक्ष गणेश भालेकर , उपाध्यक्ष समशेर पुरवले , सचिव अर्जुन पात्रे , अजय लोंढे , नरेश हातागडे , सोमलाल पात्रे , अरुण खडसे , अजय इंचुलकर , माही शेंडे , रसपाल गायकवाड सह आदि पदाधिकारी उपस्थित होते .
*येसंबा ग्रामपंचायत कार्यालय , कन्हान*
येसंबा ग्रामपंचायत कार्यालय येथे संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित सरपंच धनराज हारोडे यांच्या हस्ते
संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता कार्यक्रमात उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य , सदस्यांनी , व अधिकार्यांनी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन केले . यावेळी गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवुन संत गाडगे बाबा यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली .
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य वनिता राऊत , ग्रामपंचायत सदस्य पंकेश्वर चकोले , ग्रामसेवक मेघा मेश्राम , आय.सी.आर.पी. हिरा चकोले , अंगणवाडी सेविका माया चकोले ,आशा वर्कर सौ.सुषमा गजभिये , संजय गजभिये , बबनराव घरजाळे , हरिदास ऊके , कुमार गडे , विठ्ठलराव महाल्ले , लिला चौधरी , युवा जोश युवा सोच चे सोनु इरपाते , मोहिनी ऊके , विशाल घरजाळे सह आदि नागरिक उपस्थित होते .