*भरदाव ट्रकच्या धडकेत 35 वर्षीय इसम ठार ; नागपूर-जबलपूर महामार्गावरील आमडी येथील घटना*

रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी
नागपूर- जबलपूर महामार्गावरील आमडी येथे रस्ता ओलांडणाऱ्या एक 35 वर्षीय युवकाला भरदाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार मृतक महेश किशोर हारेकर वय 35 वर्ष. मूळ गाव काठी जि. सिवनी (मध्य प्रदेश), हा व्यक्ती काही कामानिमित्त रस्ता ओलांडत होता.अशातच भरदाव वेगाने जबलपूर कडून नागपूरकडे जात असलेल्या ट्रक क्रमांक UP 94 T 7312 याने त्या इसमास जोरदार धडक दिली.यात त्या व्यक्तीचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याचे दिसून आले.घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ रामटेक पोलिसांना देण्यात आली.PSI दीपक काँक्रीटवार, गोपाल डोकरीमारे,आशिष कुंभरे, राजेंद्र अडामे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.सदर घटनेचा तपास रामटेक पोलीस करीत आहेत.
Maharashtra News Media सच की आवाज