*हाॅटेल युनीक ईन समोरून बुलेट दुचाकी वाहन चोरी*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस सात किलो मीटर अंतरावर असलेल्या खंडाळा शिवारातील नागपुर बॉयपास राष्ट्रीय महामार्गावरील हाॅटेल समोर उभी ठेवले ली बुलेट दुचाकी वाहन अज्ञात आरोपीने चोरी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरुन पोलीस स्टेशन ला अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपी चा शोध सुरु केला आहे.

प्राप्त माहिती नुसार फिर्यादी जयंत दिवाकर कुंभलकर राहणार लोहीया ले-आऊट कन्हान हा हाॅटेल युनीक ईन चा मालक असुन त्याने आपले बुलेट दुचाकी वाहन बुधवार दिनांक.२३ फेब्रुवारी ला रात्री ९ वाजता खंडाळा शिवारातील नागपुर बॉयपास राष्ट्रीय महामार्गा वरील त्यांचे हाॅटेल समोर लाॅक करून ठेवलेली खाकी रगांची बुलेट दुचाकी वाहन ३५० सीसी, क्रमांक एम एच ४० बी एक्स ६१००, चेसीस क्रमांक. me3u355c2kh695723 व इंजीन नं. u3s5c2kh619497 किंमत ७०,००० रुपये आहे . दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक.२४ फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता हाॅटेल मधिल काम आटपुन बाहेर येवुन दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. तिचा आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन न आल्याने अज्ञात आरोपीने चोरी केल्याने कन्हान पोलीस स्टेशनला फिर्यादी जयंत कुंभलकर यांच्या तोंडी तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे .
Maharashtra News Media सच की आवाज