Breaking News

*शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री धनंजय कापसीकर*

*शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्री धनंजय कापसीकर*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान -कांद्री – कन्हान येथील धर्मराज प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्य अध्यक्षपदी एकमताने श्री धनंजय कापसीकर यांची निवड करण्यात आली.


धर्मराज प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची बैठक पार पडली. यात माजी अध्यक्ष श्री विधिलाल डहारे यांना निरोप देत नवीन अध्यक्ष म्हणून श्री धनंजय कापसीकर यांची एकमताने निवड करण्यात आली. धर्मराज प्राथमिक शाळेच्या विकासासाठी व रौप्य महोत्सव आयोजनात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन श्री कापसीकर व सर्व सदस्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी मानले. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सौ चित्रलेखा धानफोले , श्री विधिलाल डहारे , श्री धनंजय कापसीकर , श्री मंगलदिप हटवार , सौ हिरा बारई , सौ निलम मंडल , सौ स्वाती गिऱ्हे , सौ रामेश्वरी पडवार , श्री किशोर मेश्राम , अंगणवाडी सेविका सौ सविता बावणे , श्री कमलाकर कुर्वे , श्री राजकुमार महल्ले सह आदि उपस्थित होते .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …