*महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटन तालुकाध्यक्ष निलेश गाढवे तर उपाध्यक्ष मोहन वकलकर*
*सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्प गुच्छ देऊन केले सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी तालुकाध्यक्ष म्हणुन टेकाडी येथील सामाजिक कार्यकर्ता निलेश गाढवे तर उपाध्यक्ष पदी निमखेडा येथील अखाडा वस्ताद मोहन वकलकर हयानी पदभार ग्रहण केल्याने सामाजिक कार्यकर्त्यानी दोघांचे ही अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पोलीस शिपाया पासून ते पोलीस अधिकाऱ्या पर्यंत लोक सेवेसाठी पोलीस दलात कार्यरत असणारे आपले पोलीस बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी हक्काचा मंच नसल्यामुळे वर्षानुवर्षांपासून त्यांच्या समस्या जैसे थेच आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी हक्काच्या मंच तयार व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य मा. राहुल दुबाले सर यांनी पोलीस बाईज संघटनेची स्थापना केली. संघटने मध्ये जास्तीत जास्त पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे नातेवाईकाना घेण्याचा प्रयत्न करित आहे. जेणे करून घर ते पोलीस कार्यालयातल्या छोट्यातल्या छोट्या समस्यांना जाणुन घेऊन शासन, प्रशासन दरबारी मांडता याव्यात. ही संघटना एकुण ३२ जिल्ह्यात कार्यरत असुन संस्थापक अध्यक्ष मा राहुल दुबळे सरांनी नागपुर जिल्हाध्यक्ष लालसिंग यादव यांच्या शिफारशीने नागपुर जिल्हयातील पारशिवनी तालुकाध्यक्ष म्हणुन युवा सामाजिक कार्यकर्ता निलेश शालिकरामजी गाढवे तर उपाध्यक्ष पदी मोहन कवडुजी वकलकर यांची निवड करण्यात आली.

राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी तालुका अध्यक्ष निलेश गाढवे तर उपाध्यक्ष मोहन वकलकर हयानी पदभार स्विकारला. याप्रसंगी अध्यक्ष निलेश गाढवे यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले व नागपुर जिल्हाध्यक्ष लालसिंग यादव यांचे आभार व्यकत करून मान्यवरांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन नविन इमारत व कर्मचारी वसाहतची मागणी जोरात-सोरात शासन व प्रशासन दरबारी रेटुन धरू व वेळ पडल्यास पोलीस बांधवांसाठी रस्त्यावर पण उतरून समस्या सोडविण्याचे कार्य करू असे मनोगत व्यकत केले. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पारशिवनी नवनियुक्त तालुकाध्यक्ष निलेश गाढवे, उपाध्यक्ष मोहन वकलकर यांचे ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, जिल्हा प्रतिनिधी कमलसिंह यादव, कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष ऋृषभ बावनकर, सामाजिक कार्यकर्ता केतन भिवगडे, श्याम मस्के, शुभम चंहादे, रोशन सोनटक्के, रितेश जनबंधु , सचिन ढोबळे, श्रेयस झिंगरे, नितीन बुराडे हयानी पुष्प गुच्छ देऊन अभिनंदन करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .
Maharashtra News Media सच की आवाज