Breaking News

*कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट मोठ्या उत्साहात थाटात संपन्न* *राजे इलेव्हन संघ कामठी प्रथम पुरस्काराने व सेन्सुई संघ कन्हान द्वितीय पुरस्काराने सम्मानित*

*कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट मोठ्या उत्साहात थाटात संपन्न*

 

*राजे इलेव्हन संघ कामठी प्रथम पुरस्काराने व सेन्सुई संघ कन्हान द्वितीय पुरस्काराने सम्मानित*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान :- कन्हान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जय मानवता सार्वजनिक बहुउद्देशीय संस्था कन्हान द्वारे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते .या भव्य क्रिकेट टूर्नामेंट मध्ये राजे इलेवन कामठी ही प्रथम विजेता व सेन्सुई संघ कन्हान ही द्वितीय उपविजेता टीम ठरल्याने दोन्ही संघाला मान्यवरांचा हस्ते पुरस्कार व बक्षीस वितरण करुन कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आले .


शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी ला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्य जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था कन्हान द्वारे भव्य कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट चे आयोजन तेजाब ग्राउंड पोलीस स्टेशन च्या मागे करण्यात आले होते . या भव्य क्रिकेट टूर्नामेंट चा शुभारंभ रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या हस्ते व रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने , सामाजिक कार्यकर्ता रामेश्वरजी बावनकर , जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्था कन्हान चे अध्यक्ष वर्धराज पिल्ले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन विनम्र अभिवादन करीत या भव्य क्रिकेट टूर्नामेंट चा शुभारंभ करण्यात आला होता.


या भव्य क्रिकेट टूर्नामेंट मध्ये नागपूर, कामठी, कन्हान व परिसरातील ग्रामीण भागातील २२ संघांनी सहभाग घेतला होता. ज्या मध्ये सेन्सुई संघ कन्हान विरुद्ध राजे इलेव्हन संघ कामठी यांचा मध्ये अंतिम फाइनल खेळण्यात आला .या अंतिम सामन्यात राजे इलेव्हन संघ कामठी हा विजय झाल्याने टुर्नामेंट मध्ये प्रथम क्रमांक पटकाविले . तर सेन्सुई संघ कन्हान टीम ने द्वितीय क्रमांक पटकाविले.त्यानंतर अंतिम फेरीतील स्पर्धेतील विजेता राजे इलेव्हन संघ कामठी या संघाला प्रथम क्रमांकाचे पुरस्कार 51 हजार रुपए व आकर्षित बक्षीस रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार एडोकेट.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते देण्यात आले असुन द्वितीय सेन्सुई संघ कन्हान ला कन्हान नवरात्री गरबा उत्सव महोत्सवा च्या वतीने २५ हजार रुपए व आकर्षित बक्षीस देण्यात आले. या सामन्यात सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार मुस्तफार ला व उत्कृष्ट गोलंदाज, हॅट्रिक आणि सामनावीराचा पुरस्कार दिव्यांग शुक्ला ला आशाताई खंडेलवाल यांच्या हस्ते दोन हजार रुपए व आकर्षित बक्षीस वितरीत करुन कन्हान प्रीमियर लीग फ्रेश आर्म ओपन टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट मोठ्या उत्साहात थाटात संपन्न करण्यात आले .

या प्रसंगी जय मानवता सार्वजनिक बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष वर्धराज पिल्ले , शिवकुमार यादव , कृष्णकुमार अग्रवाल , नप उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक अनिल ठाकरे , नगरसेविका मौनिका पौणिकर , मनिषा चिखले , लीना हारोडे , वैशाली खंडार , शुभांगी घोघले , वैशाली श्रीखंडे , कोमल लांजेवार , लता लुंढेरे , पी डी जैस्वाल सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता चिंटू वाकुडकर , दामोदर बंड , मोती हारोडे , सुनील पिल्ले , छोटू राणे , भरत पगारे , समशेर पुरवले , हरीश तिडके , उमेश पुरवले , प्रदीप गायकवाड , उमेश पौणिकर , अजय चव्हाण , अनिल चौरसिया , तनिष्क पिल्ले , सह आदि ने सहकार्य केले .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …