Breaking News

*कन्हान नदी पुलावर चारचाकी वाहनाची दुचाकी ला धडक, दोन युवक जख्मी* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

*कन्हान नदी पुलावर चारचाकी वाहनाची दुचाकी ला धडक, दोन युवक जख्मी*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत दक्षिणेस ०.५ किलो मीटर अंतरावर असलेल्या कन्हान नदी पुलावरुन फिर्यादी व त्याचा मित्र दुचाकी वाहनाने डब्बल सीट कामठीकडे जात असतांना समोरून येणाऱ्या चारचाकी कार वाहनाने धडक मारून झालेल्या अपघातात दुचाकी चालक व मागे स्वार गंभीर जख्मी झाल्याने नागपुर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असुन कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन अज्ञात कार वाहन चालकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .


प्राप्त झालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक.२७ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता च्या दरम्यान फिर्यादी प्रदीप दिपक तायवाडे वय २६ वर्ष राहणार. विवेकानंदनगर कन्हान व त्यांचा मित्र आशिष ठाकुर राह कन्हान हे दोघे ही स्प्लेंडर प्लस दुचाकी वाहन क्रमांक. एम एच ४० ए एच ४२६६ ने डबल सीट कन्हान येथुन काही कामाने कामठी कडे जात असतांना कन्हान नदी पुलाच्या रस्त्यावर सामोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या चार चाकी कार च्या अज्ञात वाहन चालकाने आपले ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काजीपणे चालवित आणुन दुचाकी ला सामोरून धडक मारून अपघात केला. यात दुचाकी वाहन चालक व स्वार हे दोघे ही गंभीर जख्मी झाल्याने कामठी वरून शासकीय रूग्णालय नागपुर येथे उपचार्थ दाखल करण्यात आले असुन दुचाकीचे सुध्दा नुकसान झाले .


सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी जख्मी फिर्यादी प्रदीप तायवाडे यांच्या तोंडी तक्रारी वरून अज्ञात कार चालका विरूध्द कलम २७९, ३३७, ३३८ भादंवि सहकलम १८४, १३४, १७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाल हे करित आहे .

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …