Breaking News

*लोखंडी राॅडने डोक्यावर मारून जख्मी केले* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*लोखंडी राॅडने डोक्यावर मारून जख्मी केले*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – बीयर बार मध्ये झालेल्या भांडणाने आंबेडकर चौक कन्हान येथे मित्रासह बोलत उभा असलेल्या अरूण मेश्राम च्या डोक्यावर लोंखडी राडने मारून जख्मी केल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी यांच्या तक्रारी वरून भरत मोहनकर विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.


प्राप्त झालेल्या माहीती वरून अरूण ताराचंद मेश्राम वय ३६ वर्ष राहणार. धरम नगर कन्हान व भरत मोहनकर वय ४० वर्ष राहणार इंदिरा नगर कन्हान हे दोघे ही सवारी कार वाहन चालवित असुन एक दोनदा दोघाचे भांडण झाले होते. शुक्रवार दिनांक.२५ ला रात्री ८ वाजता दरम्यान अरूण मेश्राम हा आपल्या मित्रासह बियर बार मध्ये दारू पित असतांना भरत मोहनकर हा त्याच्या टेबल वर येऊन बसत भांडण केले. दोघेही बार मधुन बाहेर निघाले. अरूण मेश्राम हा आंबेडकर चौक कन्हान येथे मित्रासह बोलत उभा असताना अचानक भरत मोहनकर आला व लोंखडी राड सारख्या वस्तुने अरूण मेश्राम च्या डोक्यावर व हातावर मारून जख्मी करून निघुन गेला. अरूण मेश्राम जख्मी झाल्याने त्याचा दवाखान्यात उपचार करून कन्हान पोलीस स्टेशन ला तोंडी तक्रार दाखल दिल्याने कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोस्टे चे पोना राहुल रंगारी यांनी आरोपी भरत मोहनकर यांचे विरूध्द अपराध क्रमांक. ८८/२०२२ कलम ३२४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …