*कन्हान येथे भाजपा द्वारे विजय जल्लोष साजरा* *चार राज्यात भाजपा विजयी , पदाधिकारी व कार्यकर्ता मध्ये उत्साह*

*कन्हान येथे भाजपा द्वारे विजय जल्लोष साजरा*

*चार राज्यात भाजपा विजयी , पदाधिकारी व कार्यकर्ता मध्ये उत्साह*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – देशात झालेल्या ५ राज्याचा निवडणुकी मध्ये भाजप ला ४ जागेवर मोठ यश मिळाल्याने कन्हान तारसा चौक येथे भाजपा पदाधिकार्यांनी गुलाल उडवुन व एकमेकांना मिठाई वाटुन विजय जल्लोष साजरा केला.


मागील दोन महिन्यापासुन देशातील उत्तर प्रदेश सह ५ राज्यात निवडणुका होऊ घातले होत्या. त्याचे निकाल गुरुवार १० मार्च ला समोर आले. या मध्ये पाच राज्या पैकी भाजपा ला उत्तरप्रदेश, गोवा, मणिपुर व उत्तराखंड अश्या ४ राज्यात मोठे यश मिळाल्याने कन्हान येथे भाजपा पारशिवनी तालुका व भाजपा कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी तारसा चौक येथे भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा कन्हान शहर अध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांच्या उपस्थितीत ढोल ताशाच्या गजरात नाचत गाचत “भारतीय जनता पार्टी चा विजय असो चा जयघोष” करीत गुलाल उडवुन व एकमेकांना मिठाई वाटुन विजय जल्लोष साजरा करण्यात आला . या प्रसंगी मुलचंद शिंदेकर, सुनिल लाडेकर, रिंकेश चवरे, सचिन वासनिक, शैलेश शेळके, नगरसेवक राजेंद्र शेंदरे, विनोद किरपान, मयुर माटे, कामेश्वर शर्मा , सौरभ पोटभरे, पंकज गोंडाने, शिवाजी चकोले, भगवान सावरकर, मारोती बावने, पारस यादव, अतुल आखरे, भरत सावळे, स्वाती पाठक, सरिता लसुंते, सुषमा मस्के, तुलेषा नानवटकर, श्रवण वतेकर, ऋृषभ बावनकर, मनोज कुरडकर, नगरसेविका अनिता पाटील, सुषमा चोपकर, संगीता खोब्रागडे, वंदना कुरडकर , वर्षा लोंढे , सुनंदा दिवटे , तनुश्री आकरे, पौर्णिमा दुबे , प्रतीक्षा चवरे , गणोरकर जी सह आदि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …