Breaking News

*कन्हान येथे चार दिवसा पासुन रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू* *३५० रूपये प्रति दिवस हक्काची रोजी मिळण्याची मागणी*

*कन्हान येथे चार दिवसा पासुन रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू*

*३५० रूपये प्रति दिवस हक्काची रोजी मिळण्याची मागणी*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद येथील स्वच्छता रोजंदारी कंत्राटी कर्मचारी वाढत्या महागाईने कमी रोजंदारीत परिवारांचा उदर्नि वाह करणे कठीण होत असल्याने वारंवार रोजंदीरी वाढविण्याची मागणी करून सुध्दा दबावशाहीने कर्मचाऱ्यांना कमी रोजीत काम घेऊन मौलिक हक्का पासुन वंचित ठेवण्यात येत असल्याने चार दिवसा पासुन शांततेत काम बंद आंदोलन सुरू करून संबधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासन नियमानुसार भविष्य निर्वाह निधी भरून ३५० रूपये प्रति दिवस हक्काची रोजी मिळण्याची मागणी नगर परिषद कंत्राटी रोजंदारी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केली आहे.
कन्हान ग्राम पंचायत ते नगरपरिषदेत मागील १० ते १५ वर्षा पासुन शहरात स्वच्छता करण्याचे काम आम्ही रोजंदारीने करित आहोत. नगरपरिषदेचा स्वच्छता कंत्राटदार हा आम्हचे भविष्य निर्वाह निधी न भरता फक्त २६० रूपये प्रतिदिनाची रोजी देत असल्याने आम्ही रोजी वाढविण्याची मागणी कंत्राटदारा ला केली. तर २६० रूपये रोजीने काम करायचे असेल तर करा. नाही तर तुम्हाला काढुन दुसरे कर्मचारी ठेवी ल. नविन लोक काम करायला तयार आहे. कोरोना काळात महागाई मोठया प्रमाणात वाढली असल्याने परिवाराचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने न प प्रशासनास व कंत्राटदारास रोजी वाढविण्याची वारंवार मागणी केली. कंत्राटदार व न प प्रशासन काम करवुन घेते. रोजी वाढविण्यास कंत्राटदार व न प प्रशासन अधिकारी , पदाधिकारी दुर्लक्ष करित असल्याने कोरोना नंतर वाढलेल्या महागाईने कमी रोजीत काम करून जिवन जगणे भयंकर कठीण झाले. यास्तव रोजी रोटीच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करून शासनाच्या नियमानुसार कमीत कमी ३५० रूपये रोजी कंत्राटदारा कडुन मिळण्याकरिता कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यां नी न्यायीक हक्काची मागणी करित सोमवार दिनांक .७ मार्च पासुन शांततेत काम बंद आंदोलन सुरू करून चार दिवस झाले असल्याने कंत्राटदार व नप पदाधिकारी, अधिकारी दडपशाही करून जर न्याय हक्का पासुन वचिंत करण्याचा पर्यंत करतील तर आम्हच्या सहन शक्तीचा बांध फुटुन उदभवणाऱ्या परिणामास नगरपरिषद कन्हान-पिपरी व संबधित अधिकारी जिम्मेदार राहतील. यास्तव मा. जिल्हाधिकारी व संबधित अधिकारी, पदाधिकारी हयाना निवेदन देऊन शासन नियमानुसार भविष्य निर्वाह निधी भरून ३५० रूपये प्रति दिवस रोजंदारी मिळण्याची मागणी कंत्राटी स्वच्छता कर्मचारी रेखा कुलदिप, किरण जैवदिया, लता शेवते, शकिला नागदेवे, गणेशी सारवन, बबिता चव्हाण, इंदु मेश्राम, अंजिरा चव्हाण, रेखा देवागन, उषा शेंडे, शालु शेंडे, एकता अंबादे, अजय हातागडे, मन्नु हातागडे, विशाल लोंढे, शाहील हातागडे, गुलशन लोंढे, शुभम हातागडे, गोवर्धन वर्मा, संजय दुधबावने, रवी गोंडाणे, ओमप्रकाश देवागन, किशन कुलदिप, रोहीत कुलदिप, महेंद्र वानखेडे, महादेव खोब्रागडे,राज भालेकर, जितु शेवते, पिंटु कठाने, मनोज मधुमटके, अल्केश टेभुर्णे, पंकज जुमैल, संतोष मधुमटके, मनोज मलिक, ओमप्रकाश परिहार आदीने केली आहे.

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …