*मोवाड येथे सावित्रीबाई फुले पुण्यातिथी १२५ वी साजरी*
नरखेड़ प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
नरखेड़ – महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री शिक्षका सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी ही स्थळ लोकसत्ता रोटरी प्राथमिक शाळे मध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून प्राथमिक मुख्याध्यापक वैभव गणोरकर व योग शिक्षक श्रीकांत मालधुरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्यप हार घालून कार्यक्रम सुरू करणे आला.
यावेळी मुख्याध्यापक वैभव गणोरकर यांनी शाळेतील मुलांना व मुलगी ना सांगितले की सावित्रीबाई फुले यांच्या जन्म ३ जानेवारी १८४८ ला सातारा जवळील नायगाव गावात येथे झाला.व त्याच्या विवाह महात्मा जोतीराव फुले यांच्या सोबत झाला. मुलीच्या शिक्षण चे महत्त्व जाणून पहिला शाळा पुण्यातील भिडे वाड्यात सुरू केली त्या शाळेच्या त्या शाळेच्या मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई फुले या काम पाहु लागले . त्यावेळी फुले यांच्या शाळेत सरकारी शाळे पेक्षा विघार्थी जास्त होते.तसेच १८८५ पर्यंत ३५ विधवा ब्राह्मण स्त्रिया चे बाळतपण हे सावित्रीबाई फुले यांनी केले १८७४ साली काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवाचे त्यांनी घरी बाळत पण करून त्यांच्या मुलगा लम्हणजे यशवंतला दत्तक घेतले व शिक्षण देऊन डॉक्टर केलेत.
असे महान कार्य सावित्रीबाई फुले चे हे मुलांना सांगितले
तसेच श्रीकांत मालधुरे यांनी सांगितले की १८७७ साली महाराष्ट्र मध्ये भिषण दुष्काळ पडला .या दुष्काळात फुले दांपत्यानी लोकांना जेवणाची,आरोग्य ची मदत खूप केली.तसेच १८९६ ते ९७ साली पुण्यात जिव घेणे प्लेगची साथ आली .या साथी मध्ये अनेक आजारी लोकांच्या औषध ची व पुर्ण आजारी काळजी स्वतः सावित्रीबाई यानी घेतली यामुळे त्यांना पण प्लेगची लागण झाली .व शेवटी १० मार्च १८९७ ला सावित्रीबाई फुले याचे निधन झाले अशा प्रकारे फुले दांपत्य चे जिवणाची माहिती ही मुलांना व मुलींना सांगितली यावेळी तनमय बेले,सौरभ बिलगिये,पुरवि पाटील, वैषवी तुमाने,अर्णव नेरकर, अस्मिता खासबागे,अनेक लहान मुले व मुली उपस्थित होते तसेच मुलांना प्रसाद वाटप करुन कार्यक्रम संपन्न झाला.
Maharashtra News Media सच की आवाज