*मराठी स्थानिक युवकांना रोजगार देण्याची मागणी*
*शिवसेना माथाडी कामगार सेना व युवा सेना चे अधिकार्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान खुली खदान (w.c.l ) मध्ये छाटवल आणि नीलकंठ या कंपन्या मध्ये मराठी स्थानिक युवकांना रोजगार देण्याचा मागणी करिता शिवसेना महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना व युवा सेना कन्हान शहर च्या पदाधिकार्यांनी महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना तालुका प्रमुख समीर मेश्राम यांच्या नेतृत्वात डब्लु सी एल च्या अधिकार्यांना भेटुन या गंभीर विषयावर चर्चा करुन तसेच त्यांना एक निवेदन देऊन तात्काळ जास्तीत जास्त मराठी स्थानिक युवकांना रोजगार देण्याची मागणी केली आहे . मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन चा इशारा देण्यात आला आहे .
या प्रसंगी शिवसेना महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेना जिल्हा प्रमुख राजन सिंघ , युवासेना जिल्हा प्रमुख शुभम नवले , युवासेना जिल्हा समन्वय लखन यादव , कैलाश बर्वे , गणेश मस्के , कुणाल कापसे , सुनील यादव , शैलु यादव , रितक कापसे, रोशन खंडारे सह आदि सैकडो युवक उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज