*धर्मराज प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी*

*जागतिक महिला दिनानिमित्त सत्कार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कांद्री – कन्हान येथील धर्मराज प्राथमिक शाळेत साविञीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त महिला शिक्षिकांचा व मदतनीसांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ श्रीकृष्ण जामोद कर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय कापसीकर, मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये उपस्थित होते. सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मुख्याध्यापक श्री बढिये यांनी सावित्रीबाईंचा इतिहास उलगडत महिलांनी अधिकाधिक शिक्षणाची संधी शोधावी असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री धनंजय कापसीकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पावलावर पाऊल टाकुन अधिक दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महिला शिक्षिकांनी समोर यावे असे आवाहन केले. यावेळी डॉ श्रीकृष्ण जामोदकर व श्री धनंजय कापसीकर यांच्या हस्ते जागतिक महिला दिनानिमित्त शिक्षिका सौ चित्रलेखा धानफोले, कु. लिखिता धांडे, कु अर्पणा बावनकुळे, कु शारदा समरीत, कु प्रिती सुरजबंसी, कु हर्षकला चौधरी, सौ गिरडकर तर शा पोआ मदतनीस सुनीता मनगटे, सुलोचना झाडे, नंदा मुद्देवार, परी अनकर, उषा नाटकर, दिपाली हिवरकर यांचा गुलाब पुष्प व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना श्री जामोदकर यांनी महिलांनी आरोग्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री अमित मेंघरे यांनी तर आभार श्री राजु भस्मे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री भिम राव शिंदेमेश्राम, श्री किशोर जिभकाटे, श्री राजु भस्मे, श्री अमित मेंघरे यांनी सहकार्य केले.
Maharashtra News Media सच की आवाज