*संत गाडगेबाबा जयंती निमित्त माहुली येथे ग्राम स्वच्छता अभियान* *अखिल भारतीय धोबी समाज यांचे अभिमानास्पद कार्य*

*संत गाडगेबाबा जयंती निमित्त माहुली येथे ग्राम स्वच्छता अभियान*

*अखिल भारतीय धोबी समाज यांचे अभिमानास्पद कार्य*

रामटेक प्रतिनिधी :- पंकज चौधरी

मनसर – जवळील माहुली गावात अखिल भारतीय धोबी समाज व संत गाडगेबाबा समाज सुधारक समिती माहुली यांच्या मार्फत संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त ग्राम स्वच्छता अभियान मोहीम राबवून सर्वांचं लक्ष वेधले आहे.संपूर्ण गाव झाडून मंदिर परिसर गावातील लोकांनी श्रमदानातून स्वच्छ केले.व यानंतर देखील गावातील लोकं श्रमदानातून अशीच साफसफाई करून गाव स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू असा निर्धार केला.तसेच आपण आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापराव्या असे नेताजी खडतकर यांनी सांगितले. प्रामुख्याने या अभियनाला बंटी जयस्वाल,सुरेंद्र खरेकार,मनोज चटप,विकास खिरेकार,विनोद बिरो,सुनिल चीचखेडे,शालीक घोडमारे,अंकुश बघमारे,मनोज गिरी,लंकेश्वर पाटील तथा आदी समस्थ माहुली ग्रामस्थ यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …