Breaking News

*कन्हान परिसरात होळी व धुलिवंदन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा* *टेकाडी येथे गरदेव बाबा महोत्सव साजरा , साईनाथ विद्यालय बोरडा येथे होळी दहन* *राज्य शासनाने निर्बंधात सुट दिल्याने नागरिकां मध्ये दिसला उत्साह*

*कन्हान परिसरात होळी व धुलिवंदन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा*

*टेकाडी येथे गरदेव बाबा महोत्सव साजरा , साईनाथ विद्यालय बोरडा येथे होळी दहन*

*राज्य शासनाने निर्बंधात सुट दिल्याने नागरिकां मध्ये दिसला उत्साह*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात होळी सणाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु मागील दोन वर्षापासुन शहरात कोरोना प्रादुर्भाव असल्याने नागरिकांनी आपल्या घरीच होळी साजरी केली असुन यावर्षी कोरोना चा प्रादुर्भाव नसुन सुद्धा शासना ने निर्बंध लावल्याने नागरिकांत तीव्र रोष निर्माण होत असल्याने शासनाने निर्बंधात सुट दिल्याने शहरात नागरिकांनी होळी व धुलिवंदन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.


देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व शहरात मागील दोन वर्षापासुन कोरोनाचे थैमान घातल्याने राज्य शासनाचे निर्बंध कडक केल्याने होळी चा सण नागरिकांनी आपल्या घरीच साजरा केला असुन यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असुन सुद्धा राज्य शासनाने निर्बंध लावल्याने नागरिकां मध्ये तीव्र रोष निर्माण होत असल्याने शासनाने निर्बंधात सुट दिल्याने नागरिकां मध्ये होळी सणाचा मोठा उत्साह दिसला शहरात व परिसरात होळीचा सण येताच दोन ते तीन दिवसां पुर्वी दुकाने सजल्याने नागरिकांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळाली. गुरूवार दिनांक .१७ मार्च ला होळीच्या दिवशी नागरिकांची ‍दुपार नंतर चहल पहल पाहायला मिळाली असुन सायंकाळी परिसरातील विविध नगरात लाकडांची होळी दहन करण्यात आली . दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक .१८ ला धुलिवंदन च्या दिवशी नागरिकांनी परिसरात डिजे च्या साऊंड मध्ये नाचत गाचत, घरोघरी जाऊन, एकमेकांना गुलाल लावुन होळी च्या शुभेच्छा देत परिसरात होळी व धुलिवंदन उत्सव मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला .

*साईनाथ विद्यालय बोरडा येथे होळी दहन*

साईनाथ विद्यालय बोरडा येथे होळी निमित्य परमात्मा दांड पटटा अखाडा निमखेडा येथील चंमुनी १६ वी आष्टे डु मर्दानी आखाडा चैम्पियनशिप नागपुर येथे प्राविण्य मिळविल्याने या विद्यार्थ्या चा सत्कार करून होळी दहन करण्यात आले.


गुरूवार दिनांक .१७ मार्च ला साईनाथ विद्यालय बोरडा येथे होळी दहन कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक विनोद रच्छोरे, शिक्षक बावनकुळे सर, हुमणे सर, वस्ताद क्रिष्णाजी मरसकोल्हे खेडी, मास्टर मोहन वकलकार निमखेडा, निलेश गाढवे, राजेंद्र सांभारे खेडी, गंगाधर नागपुरे खेडी आदीच्या उपस्थित करून मान्यवरांच्या हस्ते परमात्मा दांड पटटा, अखाडा निमखेडा येथील चंमुनी १६ वी आष्टे डु मर्दानी आखाडा चैम्पियनशिप नागपुर येथे प्राविण्य मिळविलेल्या १) अल्केश वकलकार ( गोल्ड मेडल ) २) प्रतिक सांभारे ( गोल्ड मेडल ) ३) प्रांकेत नागपुरे (गोल्ड मेडल) ४) गौरव बावणे (सिल्वर मेडल) ५) प्रणव नागपुरे ( सिल्व र मेडल ) ६) कु साक्षी सुर्यवंशी ( सिल्वर मेडल ) ७) उर्वशी मलेवार ( गोल्ड मेडल) ८) सावी वकलकार ( गोल्ड मेडल ) ९) समिक्षा नागपुरे ( गोल्ड मेडल) १०) श्रावणी ठाकरे (सिल्वर मेडल) या विद्यार्थ्याचा सत्कार करून प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यानंतर होळी दहन करून सगळ्यांना होळी च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

*टेकाडी येथे गरदेव बाबा महोत्सव साजरा*

होळी च्या पावन पर्वा हनुमान मंदिर चौक टेकाडी येथे दरवर्षी प्रमाणे गरदेव बाबा महोत्सव मोठया उत्साहने शांततेत साजरा करण्यात आला.
पुरातन शेकडो वर्षाची गरदेव बाबा महोत्सव ही परंपरा ची सुरूवात ढोल नगाडया च्या तालत पुजा अर्चना करून भक्तानी प्रत्येकांनी क्रमाक्रमाने गरदेव बाबा च्या भोवती फिरून वंदन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मारोती बोरघरे, रामचंद्र राउत, पंढरी बाळबुधे, मनोज लेकुरवाले, जनार्दन सातपैसे, अंबादास सातपैसे, सचिन भोयर, गंगाधर आकोटकर, आनंद गजभिये, पंकज राउत आदींनी सहकार्य केले.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …