*साटक येथे आठ लक्ष रूपयांच्या विकास कामाचे भुमिपुजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – जिल्हा परिषद नागपुर अंतर्गत गोंडेगाव-साटक गट जिल्हा परिषद क्षेत्रातील साटक येथे जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष उपगटनेता मा. व्यकटेशजी कारेमोरे यांचे शुभहस्ते आठ लक्ष रुपयांचे विकास कामांचे भुमिपुजन करण्यात आले.
जिल्हा परिषद नागपुर विकास काम निधी अंतर्गत गोंडेगाव-साटक जिल्हा परिषद च्या ग्राम पंचायत साटक येथील साटक -आमडी रस्त्यावरील ५ लक्ष रूपयांचे पुल बांधकाम व ३ लक्ष रूपयांचे मातीकाम असे एकुण ८ लक्ष रूपयांच्या विकास कामाचे भुमिपुजन जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्ष उपगटनेता मा.व्यकटेशजी कारेमोरे यांचे शुभहस्ते व मा.सितारामजी भारद्वाज, पंचायत समिति सदस्य नरेश मेश्राम, ग्रामपंचायत साटक सरपंचा सौ सिमाताई उकुंडे, उपसरपंच गजानन वांढरे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले . याप्रसंगी भिमराव वाडीभस्मे, यशवंतराव उकुंडे, मनिराम वाडीभस्मे, गोविंद चोपकर, सतिश वाडीभस्मे, तरूण बर्वे, राजुजी वाडीभस्मे, मधुकरजी ङेंगे, अमोल वाडीभस्मे, कमलेश सुरसे, भोला गुरुपंचांग सह शेतकरी आणि गावकरी आवार्जुन उपस्थित होते.