*वीरांगना रानी अंवतीबाई लोधी बलिदान दिवसी स्मरण*
*क्षत्रिय लोधी समाज कन्हान आणि महा राणी वीरागंना अंवतीबाई लोधी राष्ट्रीय प्रचार समिती व्दारे कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – क्षत्रिय लोधी समाज कन्हान आणि महाराणी वीरागंना अंवतीबाई लोधी राष्ट्रीय प्रचार समिती व्दारे महाराणी वीरागंना अंवतीबाई लोधी यांच्या बलिदान दिवसी अभिवादन करून त्यांचे स्मरण करण्यात आले.
इसवी सन १८५७ स्वातंत्र्य सग्रामाच्या प्रणेता मध्य भारतातील रामगढ च्या महाराणी वीरागंना अंवतीबाई लोधी हया शत्रुशी लढता लढता (दि.२०) मार्च ला त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. तो दिवस बलिदान दिवस म्हणुन दरवर्षी साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने रविवार (दि.२०) मार्च २०२२ ला जि प शाळा पिपरी समोर क्षत्रिय लोधी समाज आणि महाराणी वीरागंना अंवतीबाई लोधी राष्ट्रीय प्रचार समिती व्दारे महाराणी वीरागंना अंवतीबाई लोधी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करित स्मरण करण्यात आले. या प्रसंगी समिती अध्यक्ष श्रवण वतेकर, मुलचंद शिंदेकर, लोकेश दमाहे, किरण ठाकुर, मोहीत वतेकर, पवन टिकम, बाला खंगार, रोहन पटेल, महावीर पटेल, नरेंद्र सोलंकी सह समाज बांधव उपस्थित होते.