*इंदिरा मागास्वर्गिय मुलांचे वस्तिगृह कन्हान – कांद्री येथे शहिदांना दिली श्रद्धांजलि*
*नवोदय जनोत्थान संघटन कन्हान शहर द्वारे श्रद्धांजलि कार्यक्रमाचे आयोजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – नवोदय जनोत्थान संघटन कन्हान शहर द्वारे २३ मार्च शहिद दिवस निमित्य कार्यक्रमाचे आयोजन इंदिरा मागास्वर्गिय मुलांचे वस्तिगृह कन्हान कांद्री येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संघटन अध्यक्ष प्रवीण गोडे यांच्या हस्ते शहीद भगत सिंह यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली . यावेळी शहीद भगत सिंह, राजगुरू, सुखदेव यांना स्मरण करण्यात आले असुन अध्यक्ष प्रवीण गोडे, उपाध्यक्ष संजय रंगारी, कोषाध्यक्ष सतीश उके , गहुहिवरा ग्रामपंचायत सदस्य निखिल पाटिल , वस्तिगृह अधिक्षक व संघटन सदस्य मनिष शंभरकर यांनी शहीदांच्या जिवनावर प्रकाश टाकुन विध्यार्थांना इतिहास सांगुण दोन मिनटाचा मौन धारण करुन शहिदांना श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली .
या प्रसंगी अभिजित चांदुरकर , गौरव कुर्वे , प्रवीण माने , प्रकाश कुर्वे , विध्यार्थी गण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सचिव प्रदिप बावने यांनी केले आभार व्यक्त सोनु खोब्रागडे यांनी केले