*वीज उद्योगाच्या अस्तित्वासाठी लढा-कॉम्रेड मोहन शर्मा*
*राज्यात वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात*
खापरखेडा प्रतिनिधी –
खापरखेड़ा – विज उद्योगातील ३९ कामगार संघटनांनी एकत्र येऊन केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात देशव्यापी संप व महाराष्ट्रातील वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याचा धोरणाच्या विरोधात दिनांक २८ मार्च पासून दोन दिवसीय संपावर जाण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अधिकारी, अभियंते संघर्ष समिती, व महाराष्ट्र राज्य कंत्राटी कामगार संघटना कृती समितीने घेतला आहे दोन दिवसीय संपाच्या पहिल्याच दिवशी ५०० मेगावॅट खापरखेडा औष्णिक वीज केंद्र मनोरंजन गृह १ समोर कॉम्रेड मोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जाहीर सभेत केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणांचा जाहिर निषेध करण्यात आला.
सदर जाहिर सभेत संबोधित करताना महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा यांनी सांगितले की, वीज उद्योगात फार मोठया प्रमाणात खाजगीकरण सुरू झाले आहे त्यामूळे वीज उद्योगाच्या अस्तित्वासाठी त्याला वाचविण्यासाठी लढा सुरू झालेला आहे खाजगीकरण करून खाजगी उद्योगजकाना, कार्पोरेट घराण्याना घशात घालण्याचा घाट बांधला जात असल्याचा आरोप केला यावेळी त्यांनी संपाबाबत विस्तृत माहिती सांगितली.
याप्रसंगी अनेक कामगार नेत्यांची भाषणे झालीत यावेळी विजय डेविड, राहुल बागडे, स्वपनिल पाटील, रोशन गोस्वामी, सुधिर धार्मिक, मारोती भोज, थापा, विवेक गुड्रुकवार, प्रमोद ठाकरे, पुरूषोत्तम मानकर, मुकेश ढोले, भुपेन्द्र चतुर्वेदी, अनिल बोरकडे, मोनुकुमार पांडे, मणिष भोंदेकर, दिलीप गावंडे आदि उपस्थित होते याप्रसंगी शेकडीच्या संख्येत अधिकारी, अभियंता, कर्मचारी कंत्राटी कामगार उपस्थित होते.
मागील दोन महिन्यांपासून वीज कर्मचारी,अभियंते, अधिकारी संयुक्त संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना कृती समिती तर्फे चालू असलेल्या आंदोलनाचे रूपांतर शेवटी दोन दिवसाच्या संपात झाले.वीज कर्मचाऱ्यांवर विधायक प्रभाव असणाऱ्या सर्व संघटना संपात सामील झाल्या आणि महाराष्ट्रातील वीज निर्मिती बंद व्हायला लागली. राज्य अंधारात जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी नाईलाजाने का होईना संपाच्या पहिल्या दिवशी २८ मार्चला सर्व संघटनांच्या प्रमुख प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्स वरून चर्चा केली, उशिराने चर्चा करतो म्हणून दिलगिरी व्यक्त केली आणि संप मागे घेण्याची विनंती केली.
याबाबत संघटना प्रतिनिधींनी एकमुखाने खाजगीकरण करणार नाही असे लेखी द्या आणि समक्ष चर्चा करून लेखी करार करावा अशी मागणी केली.असून उद्या दिनांक २९ मार्च रोजी मुंबई येथे चर्चा केली जाईल असे सांगण्यात आले. त्यानुसार ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक होवून त्यात संपाबाबत आणि पुढील आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल.तूर्त संप चालूच राहील.जो पर्यंत संयुक्त संघर्ष समिती व कृती समिती बरोबर तर्फे अधिकृत करार होत नाही तो पर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतलेला आहे.कर्मचाऱ्यांनी कोणतेही अफवांना बळी पडू नये असे आवाहन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांनी केले आहे.