*300 आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा त्वरीत मागे घेण्याची मागणी* *भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*

*300 आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा त्वरीत मागे घेण्याची मागणी*

*भाजपा पदाधिकार्यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेबांनी विधानभवनात 300 आमदारांना मोफत घरे देण्याच्या घोषणा केल्याचा निषेधार्थ भाजपा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांनी तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना लिखित निवेदन पाठवुन 300 आमदारांना मोफत घरे देण्याची घोषणा त्वरीत मागे घेण्याची मागणी केली आहे .


निवेदनात सांगितले कि आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयाबाबत प्रथम प्राधान्य कोणाला? शहीद विधवा पत्नीला? कोविड काळात प्राण गमावलेल्या पोलीसाला? ज्यांच्या डोक्यावर छत नाहीत अशा कोविड काळात सेवा देणाऱ्या डॉक्टरर्स, नर्स, कंपाऊडर इतर कर्मचारी ज्यांनी प्राण गमावलेत त्यांच्या कुटुंबाला? प्राधान्य कोणाला? आपण सभागृहात आमदारांना मोफत घरे देणार असा निर्णय जाहीर केला. निर्णयाला विरोध असण्याचा कारण नाही. मात्र या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात.. देशाच्या सीमेवर मातृभुमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडणानाऱ्या शहीद सैनिकांच्या लहान कच्चाबच्चांना, त्यांच्या म्हाताऱ्या आईवडिलांना, त्यांच्या निराधार विधवा पत्नीला, ज्याच्या डोक्यावर छत नाही अशा कुटुंबांना अगोदर मोफत घरे देणार? की सरकार म्हणून आधी स्वतःचच मल म्हणत आमदारांना देणार? असा प्रश्न विचारत कोविड काळखंडात स्वतःचा जीव धोक्यात घालत ज्यांनी स्वतः चे प्राण गमावले. कोणतीही स्वतःच्या कुटुंबाची चिंता न करता लोकांची सेवा करताना ज्या डॉक्टरर्स, नर्स, कंपाऊंडर, पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी, नगर पालिका, महानगर पालिका कर्मचारी वर्ग यापैकी अनेकांनी लोकांची सेवा करतांना आपले प्राण गमावलेत. खऱ्या अर्थाने ते देखील शहीदच आहेत . हे माहित असून ही की कोविड काळात लोकांची सेवा करतांना स्वतःचा जीव देखील जाऊ शकतो. तरी देखील सेवेला ज्यांनी प्राधान्य दिले .मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आपण आणि आपले सरकार मोफत घरे देताना त्यांचा प्राधान्याने विचार करणार की कोणाचा करणार? एसटी कामगार एकापाठोपाठ एक आक्कोश करत आत्महत्या करत आहेत. वीज तोडणीमुळे शेतकरी त्रस्त आहे. मात्र सरकारचे एकच उत्तर पैसा नाही. परंतु आमदारांना कोटयवधीची मोफत घरे देण्यासाठी पैसा आहे. सेवा आणि त्यागपूर्ण भावनेतून जनसेवा करणे हे जनप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य आहे. अर्थात आमदारांना घरे देण्याच्या निर्णयाबाबत विरोध असण्याचे कारण नाही, पण शहीद विधवा पत्नी आणि आमदार यापैकी पहिले मोफत घर कोणाला याचे उत्तर महाराष्ट्राला विचाराल तर हा शिवरायांचा महाराष्ट्र शहीद सैनिकाची पहिली निवड करेल, कोविड काळात सेवा करताना ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या डोक्यावर छत नाही त्याच्याच कुटंबाला पहिले प्राधान्य देईल आणि द्या अशी मागणी भाजपा पारशिवनी तालुका पदाधिकार्यांनी
भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊजी दिवटे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रशांत सांगडे यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवुन केली आहे .
या प्रसंगी भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रामभाऊजी दिवटे , भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे , भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक वैद्य , युवा मोर्चा महामंत्री मनोज गिरी , सौरभ पोटभरे , लोकेश अंबाडकर सह आदि भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …