*केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचावर गुन्हा दाखल करण्याची मागणी*
*नाभिक एकता मंच पारशिवणी तर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : केंद्रीय मंत्री जालन्यातील एका कार्यक्रमात नाभिक समाजाला आघाडी सरकारच्या सरकार सोबत तुलना करून आक्षेपार्ह विधान केल्या मुळे सकल नाभिक समाजाचे मन दुखावल गेल्याने सर्वत्र या नेटकरी मंडळींना टिंगल उडवण्याचे काम सुरू झाल्यामुळे नाभिक समाज चांगलाच संतापला आहे नाभिक एकता मंचाचे पारशिवणी तालुक्याचे अध्यक्ष सुनील लक्षणे यांचा नेतृत्वात तारसा रोड वरील उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांना निवेदन देऊन केंद्रीय मंत्री दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे अन्यथा तालुका भर आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे .
या प्रसंगी नाभिक नेते शरद वाटकर , संतोष दहिफळकर , आकाश पंडितकर , कचरू आजनकार , छत्रपती येस्कर , प्रभाकर कावळे , किशोर गाडगे , मंगेश वाटकर , रुपेश बोरकर , प्रशांत लक्षणे , राहुल साखरकर लाला लक्षणे , समीर लक्षणे सह आदि नाभिक एकता मंचाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
शरद वाटकर यांची प्रतिक्रिया
स्वतःची उदो उदो करण्यासाठी आपली राजकीय पोळी भाजून कोणत्या ही समाजच मन दुखावून अपमान करून तुम्ही सत्ता कशी मिळवाल याची वाट सकल नाभिक समाज पाहिल अशी प्रतिक्रिया शरद वाटकर यांनी दिली .