*शिवसेना पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांच्या शिवसंपर्क प्रचाराला सुरुवात*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख मा.श्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये शिवसेना पदाधिकारी व बुथ प्रमुखा सोबत शिवसंपर्क अभियान सुरु आहे .

शुक्रवार दिनांक २५ मार्च २०२२ ला कन्हान येथील नगर परिषद नवीन इमारत मध्ये शिवसंपर्क अभियान निमित्य बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . ही बैठक संजय काळे , राजू नाईक , (मुंबई) , शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले , कन्हान – पिपरी नगरपरिषद नप नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक अनिल ठाकरे , महिला प्रमुख शुभांगी घोघले , माथाडी कामगार सेना प्रमुख समीर मेश्राम , रामटेक विधानसभा युवा सचिव लोकेश बावनकर , शहर प्रमुख छोटु राणे , महिला शहर प्रमुख मनिषा चिखले सह आदिं च्या प्रमुख उपस्थिती मध्ये पार पडली . बैठकी मध्ये शिवसेना वरिष्ठ नेत्यांनी शिवसेना पदाधिकारी व बूथ प्रमुखांनी एकत्र येऊन पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी शिवसंपर्क अभियान घरोघरी जाऊन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे . या प्रसंगी नगरसेविका मौनिका पौणिकर , लीना हारोडे , वैशाली खंडार , साकोरे काकु , नितु तिवारी , कुर्वे ताई , चिंकु वाकुडकर , हरिष तिडके , अजय चव्हान , भरत पगारे , समशेर पुरवले , संजय शेंदरे , उमेश पौणिकर , प्रकाश तिवारी , आशिष पात्रे सह आदि शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज