Breaking News

*चार आरोपींनी संगमत करुन फिर्यादी महिलेच्या पती ला मारुन केले गंभीर जख्मी* *फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*चार आरोपींनी संगमत करुन फिर्यादी महिलेच्या पती ला मारुन केले गंभीर जख्मी*

*फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीस स्टेशन ला चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक एक येथे चार आरोपींनी अज्ञात कारणा वरुन फिर्यादी महिलेच्या पती ला राॅड , हाॅकी स्टीक व हातबुक्याने माराहण करुन गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी महिलेच्या यांच्या तक्रारी वरुन चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे .
प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक २४ मार्च २०२२ ला सायंकाळी ६:०० ते ६:३० वाजता च्या दरम्यान फिर्यादी शारदा विशाल चाफले वय ३६ वर्ष राहणार वार्ड क्रमांक एक कांद्री कन्हान व फिर्यादी यांचे पती विशाल क्रिष्णाजी चाफले हे त्यांचा घरा शेजारी राहणारे राजु पराडकर यांच्या घरी बसले असता आरोपी १) मुरगन तेवर अन्ना २) विजय मुरगन तेवर ३) विक्की मुरगन तेवर ४) कु. बिजी तेवर सर्व राहणार कांद्री कन्हान यांनी संगमत करुन राजु पराडकर यांच्या घरात जावुन फिर्यादी चे पती विशाल चाफले यास आरोपी मुरगन तेवर यांनी त्यांचा हातातील लोखंडी राॅडने नाकावर व डोक्यावर मारले आरोपी विजय तेवर ह्याने त्याचा हातातील हाॅकी स्टीक ने विशाल चाफले यांचा डोक्यावर मारले व आरोपी विक्की तेवर ह्याने सुद्धा त्यांचा हातातील लाकडी दंड्याने विशाल चाफले यांचा डोक्यावर मारले असता फिर्यादी ही आपल्या पती ला वाचविण्याकरिता आली असता बिजी तेवर हिने फिर्यादी महिलेला हातबुक्याने माराहण करुन केस ओडले व त्यानंतर चार ही आरोपी तेथुन निघाले असता फिर्यादी महिलेच्या पती ला गोलु पराडकर , गोपाल पराडकर , व शेजार च्या लोकांच्या मदतीने उपचाराकामी प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता डाॅक्टरांनी तपासुन पुढील उपचारा करिता आशा हाॅस्पीटल कामठी येथे दाखल करण्यात आले असुन उपचार सुरू आहे .
सदर प्रकरणा बाबत कन्हान पोलीसांनी फिर्यादी शारदा विशाल चाफले यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन आरोपी १) मुरगन तेवर अन्ना २) विजय मुरगन तेवर ३) विक्की मुरगन तेवर ४) कु. बिजी तेवर यांच्या विरुद्ध ३२३ , ३५४ , ५०९ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …