*देवलापार ते रामटेक गडमंदिर श्रीरामप्रभू पायदळ दिंडी यात्रेची बैठक संपन्न*
*विविध प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली*
रामटेक – देवलापार येथे देवलापार ते रामटेक गडमंदिर दीड दिवसीय श्रीरामप्रभू पायदळ दिंडी यात्रा ९ ते१० एप्रिल दरम्यान काढण्यासंदर्भात बैठक दुपारी १ वाजताच्या दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री सनतजी गुप्ता, जिल्हा सहमंत्री मंगलप्रसाद घुगे,उपाध्यक्ष अनिल कंगाली,यात्रा संयोजक पुरूषोत्तम डडमल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी प्रांत सहमंत्री सनतजी गुप्ता यांनी सांगितले की, भगवान श्रीराम वनवासात असतांना याच मार्गाने रामटेक गडमंदिर येथे जावून अगस्ती ऋषीला भेटले.त्यावेळी या परिससरात राक्षस प्रवृत्ती ने उच्छाद मांडला होता.ऋषी, मुनीं त्रस्त होते.म्हणून भगवान श्रीरामाने या ठिकाणी शपथ घेतली की,”निशीचर हीन करहू मही यह प्रण है श्रीराम का जब तक पुरण काम न होगा नाम नही विश्राम का”म्हणजेच जो पर्यंत राक्षस प्रवृत्तीचा संपूर्ण नास करणार नाही तो पर्यंत मी शांत बसणार नाही.त्यामुळे ही तपोभूमी आहे.या ठिकाणी जो ही संकल्प करू तो पूर्णत्वास जातोच असे गुप्ता यांनी सांगितले.तसेच या दिंडी यात्रेच्या माध्यमातून या परिसरात सात्विक भाव जागृत होवून नवं चैतन्य निर्माण व्हावे.यासाठीच विश्व हिंदु परिषदेच्या वतीने या यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्रेमध्ये मुख्य श्री राम दरबार मुख्य रथ व परिसरातील भजनी मंडळ,भाविक भक्त सहभागी होणार आहेत.या पायदळ
दिंडी यात्रेमध्ये विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री मिलिंदजी परांडे तसेच क्षेत्राचे,प्रांताचे विहिपचे प्रमुख पदाधिकारी दोन दिवस सहभागी होणार आहेत. त्याच अनुषंगाने आज विविध समित्यांचे प्रमुख निवडण्यात आले.
या होणाऱ्या दिंडी यात्रेत परिसरातील अधिकाधिक धर्मप्रेमी नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.