*कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत मोक्याच्या ठिकाणी सी.सी.टीवी कॅमेरे लावण्याची मागणी*
*कन्हान शहर युवक कॉंग्रेस द्वारे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा मार्फत पोलीस अधिक्षकांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत मागील अनेक दिवसान पासुन चोरी , घरफोडी , चाकु , तलवार हल्ला सारखे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असुन कन्हान पोलीसांना आरोपी शोधण्यात अडचणीचा सामना करावा लागत असल्याने कन्हान शहर युवक काॅंग्रेस च्या पदाधिकार्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा मार्फत पोलीस अधिक्षकांना निवेदन पाठवुन तात्काळ कन्हान पोलीस स्टेशन हद्दीत मोक्याच्या ठिकाणी सी.सी.टीवी कॅमेरे लावण्याची मागणी केली आहे .

कन्हान पोलीस स्टेशन हे नागपुर ग्रामीण जिल्ह्यातील संवेदनशील ठाणे गणल्या जात असुन आपराधिक घटनेमुळे नेहमीच चर्चेत राहतो या शिवाय महामार्ग वर असलेल्या शहरात अनेक अपघात सुद्धा होत असतात तर त्या घटनामध्ये दाखल गुन्ह्याचा शोध घेण्याकरिता कन्हान पोलीस विभागाला अनेक अडथळ्याचा सामना करावा लागतो . सीटी मध्ये हाईटेक पोलिसिंग केली जाते किंतु ग्रामीण भाग असल्याने कन्हान जश्या संवेदनशील पोलीस स्टेशन अंतर्गत मोक्याचा ठिकाणी सीसीटीवी कैमरे सुद्धा उपलब्ध नाही . ज्यामुळे एखाद्या प्रकरणातील आरोपीचा शोध घेणे कठीण होते व वेळीच माहिती होत नसल्याने आरोपी हद्दपार करुन पसार होतो . तरी पोलीस विभागाच्या तपासात अत्यंत लाभकारी ठरणाऱ्या सीसीटीवी कैमरे मोक्याचा ठिकाणी तात्काळ लावण्यात अशी मागणी कन्हान शहर युवक काॅंग्रेस च्या पदाधिकार्यांनी आकिंब सिद्दीकी यांच्या नेतृत्वात रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बागवान यांचा मार्फत पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांना निवेदन पाठवुन केली आहे .

या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेविका रेखा टोहने , अजय कापसिकर , पंकज गजभिये , शुभम गजभिए , विशाल शेंडे , बबलू खान , अनस शेख , प्रदीप बावने , सागर हुमने , साहिल खान , तौफीक शेख सह आदि युवक काॅंग्रेस चे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज