*कांद्री येथे महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या १०१ व्या जयंती पदयात्रेने साजरी* *फुलाच्या वर्षाने पालखीचे सेवकांनी केले स्वागत*

*कांद्री येथे महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या १०१ व्या जयंती पदयात्रेने साजरी*

*फुलाच्या वर्षाने पालखीचे सेवकांनी केले स्वागत*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कांद्री येथे महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या १०१ व्या जयंती निमित्य मानव मंदिर शाखा कांद्री द्वारा भव्य पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असुन मान्यवरांचा हस्ते बाबा जुमदेव यांच्या प्रतिमेचे पुजन करून पदयात्रा काढण्यात आली. विविध ठिकाणी पदयात्राचे फुलाच्या वर्षाने, अल्पोहार, लस्सी वितरण करून जोरदार स्वागत करित बाबा जुमदेव यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.


रविवार दिनांक.३ एप्रिल ला महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या १०१ व्या जयंती निमित्य मानव मंदिर शाखा कांद्री कन्हान द्वारा भव्य पालखी पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे, कांद्री ग्राम पंचायत सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, सदस्य शिवाजी चकोले, योगेश वाडीभस्मे, रामजी बावने, हरीचंद नाटकर, वसंता लोहकरे आदिंच्या प्रमुख उपस्थितीत बाबा जुमदेव यांच्या प्रतिमेचे पुजन करून पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेचे कांद्री परिसरात विविध ठिकाणी फुलाच्या वर्षाने, अल्पोहार, लस्सी, पाणी बॉटल, शरबत वितरण करून भव्य स्वागत करण्यात आले. पालखी संपुर्ण कांद्री परिसर भ्रमण करून मानव मंदिर येथे पालखी पदयात्रेचे समापण करण्यात आले कार्यक्रमात जि प अध्यक्षा रश्मी बर्वे, सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, योगेश वाडीभस्मे आदीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. अल्पोहार वितरण करून बाबा जुमदेव यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.


या प्रसंगी गणेश सरोदे, प्रशांत देशमु ख, किशोर वाडीभस्मे, महेश सरोदे, राहुल टेकाम, संकेत चकोले, रोहित चकोले, ज्ञानेश्वर वैद्य, अरूण पोटभरे, संगीता वांढरे, रेखा सावरकर, कल्याणी सरोदे , तनुश्री आकरे, मीराबाई सरोदे, इंदुबाई ढोबळे, पार्वती देशमुख, मीना पडोळे, नरेश कुंभलकर, सुरेश आंबिल डुके, कैलास आकरे, विलास कुंभलकर, सिताराम नाटकर, महादेव सावरकर सह गावकरी नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …