Breaking News

*कन्हान पटेल नगर येथे युवकास चाकुने मारून केले गंभीर जख्मी* *कन्हान परिसरात दिवसेन दिवस चाकु हल्ल्या च्या गुन्हयात वाढ* *फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोस्टे ला एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

*कन्हान पटेल नगर येथे युवकास चाकुने मारून केले गंभीर जख्मी*

*कन्हान परिसरात दिवसेन दिवस चाकु हल्ल्या च्या गुन्हयात वाढ*

*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन पोस्टे ला एका आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस एक किलो मीटर अंतरावर असलेल्या पटेल नगर कन्हान येथे एका आरोपीने युवकाच्या छातीवर चाकु ने मारून गंभीर जख्मी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध सुरु केला आहे.


कन्हान शहरात व परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळत असुन दिवसेदिवस मारामारी, चाकु हल्ल्या गुन्हयाच्या प्रमाणात वाढ होत असल्याने परिसरातील नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होत आहे .

प्राप्त झालेल्या माहिती नुसार बुधवार दिनांक ६ एप्रिल २०२२ ला रात्री १०:३० ते ११:०० वाजता दरम्यान विक्की मोहसीन लोंढे वय ३२ वर्ष राहणार पटेल नगर कन्हान हा आफताब अशफाक खान वय २२ वर्ष राहणार पटेल नगर कन्हान यांच्या जवळ येऊन तु माझ्या सोबत गाडीवर चाल असे म्हणुन घेवुन गेला व शिवीगाळ करून ” तुने मेरी लोगो मे बदनामी की ” असे बोलुन जीवे मारण्या ची धमकी देऊन हातापाई करित चाकु सारख्या धारदार वस्तुने आफताब खान यांच्या छातीवर मारून गंभीर जख्मी केले. अश्या फिर्यादी आफताब खान यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध कलम ३२४, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे ए एस आय गणेश पाल हे करित असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …