*मोठी बातमी*
*तामसवाडी नदी परिसरात हवेत गोळीबार*
*इम्पोटैड माऊजरसह पाच जिवंत कारतुस जप्त , दोन आरोपी अटक , एक फरार आरोपी चा शोध सुरु*
*स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – पारशिवनी तालुक्यातील तामसवाडी नदी परिसरात तीन आरोपींनी संगमत करुन हवेत गोळीबार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळखळ उडाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी श्रीकांत नारनवरे यांचा घरातून एक इम्पोटैड माऊजर सह
पाच जिवंत कारसुत जप्त केला असुन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर प्रकरणी दोन आरोपींना अटक करुन एका आरोपी चा शोध सुरु केला आहे .
पोलीस सुत्रान कडुन मिळालेल्या माहिती नुसार सोमवार दिनांक ११ एप्रिल ला दुपार ते सायंकाळ च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी तामसवाडी नदी परिसरात हवेत गोळीबार केली होता . सदर प्रकरणा बाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती . गोळीबार प्रकरणातील तीन जण तामसवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमी दाराकडुन मिळाल्याने पोलिसांनी तामसवाडी येथील श्रीकांत नारनवरे (३०) याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून आयात केलेला माऊजर आणि पाच जिवंत कारतुस जप्त करण्यात आली आहेत. पाराशिवनी तालुक्यातील दहेगाव जोशी येथील सागर सहारा (२३) याने एक माऊजर आणि सात जिवंत काडतुसे आणल्याचे आरोपी श्रीकांतने पोलिसांना सांगितले. सोमवारी दुपारी आरोपी सागर सहारे वय २३वर्ष रा.दहेगाव जोशी , श्रीकांत नारनवरे वय ३० वर्ष रा. तामसवाडी , आणि प्रतीक चावरे वय २३ वर्ष रा. सिल्लेवाडा हे तामसवाडी जवळील नदी जवळ गेले होते. तेथे प्रतीकने माऊजर ची चाचणी करण्याच्या उद्देशाने हवेत दोनदा गोळीबार केला . पोलिसांनी श्रीकांत नारनवरे आणि प्रतीक चवरे ला अटक केली आहे. तर सागर सहारे चा शोध सुरु केला आहे.

तिन्ही आरोपींचे चणकापूर येथील रहिवासी कृष्णा यादव याच्याशी जुने वाद विवादा असल्याचीही माहिती मिळाली आहे . याच कारणा वरुन बदला घेण्याच्या उद्देशाने तिघांनीही माऊजर विकत घेतला होता . तिघेही मिळून कृष्णा यादवला मारण्याचा कट रचत होते . सदर प्रकरणा बाबत पारशिवनी पोलीस स्टेशन ला तीन ही आरोपी विरुद्ध कलम ३, ५ (१), २५, २७ भादंवि आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई नागपुर ग्रामीण पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे , पीएसआय अनिल राऊत यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी नाना राऊत, वीरेंद्र नरड, साहेबराव बहाळे, विनोद काळे सह आदिंनी ही कारवाई यशस्विरित्या पार पाडली .
Maharashtra News Media सच की आवाज