*कोरोना चे पैसे मिळवुन देण्याचा नावावर १६२५० रूपयाची महिलेची फसवणूक*
*कोरानाचे पैसे मिळवुन देण्याचा नावावर भांमटे सक्रिय*
*फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कोरोना महामारी मध्ये बरेच लोकांचा डोक्यावर आभाळ कोसळले तर काही कुटुंबासह घरचा आधार निघून गेला. अशा असाहाय्य परिवारातील लोकांना कोरानाचे पैसे मिळवुन देण्याचा नावावर भांमटे सक्रिय झाले असुन अशा प्रकार कन्हान शहरातील हद्दीत कोरोनाचे पैसे मिळवुन देण्याचा नावावर सोळा हजार दोनशे पन्नास रूपयाची महिलेची फसवणूक करण्यात आली.

पोलीस स्टेशन अंतर्गत वैष्णवी आॅप्टीकल पुढे गुरुवार दि.7 रोजी वेळ दुपारी ११ ते २ वाजता च्या दरम्यान मंजुळा वामनराव डेंगे (६५ ) रा. राधाकृष्ण नगर, कन्हान ही रस्त्याने पायदळ जात असतांना अज्ञात आरोपी महिलेने हाक मारुन ‘तुम्ही अमोल डेंगे च्या आई आहात का, कुठे जात आहात ? असे विचारुन ‘मि तुम्हाला कोरोना चे पैसे मिळवुन देते. त्याकरिता तुम्हाला शासकीय रुग्णालय कामठी येथे यावे लागेल. असे बोलत रस्त्याने जाणारी रिक्षात बसवून शासकीय रुग्णालय कामठी येथे उतरले व शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर आरोपी महिलेने कोरोना चे पैसे काढुन देण्यासाठी साहेबांना पाच हजार रुपये द्यावे लागतात. पैसे नसतील तर सोन्याचे दागिने दिले तरी चालतील असे बोलत मंजुळा डेंगे यांनी गळ्यातील सोन्याचे दागिने किंमत १६२५० रुपयांचा माल आरोपी महिलेस दिला ती यावर अधिकाराची सही घेऊन येतो सांगुन निघुन गेली. परंतु आरोपी महिला परत आली नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्याने. कन्हान पोलीस स्टेशन गाठत मंजुळा डेंगे यांच्या तोंडी रिपोर्ट वरुन अज्ञात महिला विरुद्ध ४२० भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात सहयक फौजदार गणेश पाल करीत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज