*न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत बालमेळाव्याचे आयोजन*

*न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत बालमेळाव्याचे आयोजन*

सावनेर –  दिनांक 16/04/2022 ला न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळा सावनेर येथे शाळापुर्व तयारी उपक्रम अंतर्गत *बालमेळावा* आयोजित करण्यात आला.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ आशाताई कराळे,विषयतज्ञ या.श्री.लक्ष्मीकांतजी पोटोडे,विषयतज्ञ या.श्री.उमेशजी धोटे पंचायत समिती सावनेर, मुख्याध्यापिका सौ अनिता गणेश झाडे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलीत करून करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सौ.अनिता झाडे यांनी कोरोना काळात केजी 1 आणि केजी 2 चे वर्ग बंद होते आणि आता ते विद्यार्थी 2022-2023 मध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार आहे.या विद्यार्थ्यांना शाळेविषयी कुठलीही भीती राहु नये आणि इयत्ता पहीलीच्या अध्ययन क्षमता विकसित करावयाच्या दृष्टीकोनातून शासनाने शाळापुर्व तयारी उपक्रम सुरू केला आहे त्याबाबत माहिती दिली.प्रमुख पाहुणे श्री.लक्ष्मीकांत पोटोडे यांनी शाळापुर्व तयारी उपक्रम कशाप्रकारे राबयाचा,पालकांची आणि स्वयंसेविकांची भुमिका काय आहे हे सांगीतले तर श्री.उमेश धोटे यांनी कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित पालकांचे कौतुक केले.
त्यानंतर पहीलीत दाखलपात्र मुलांची लावण्यात आलेल्या 7 स्टाॅलवर पुर्वचाचणी घेण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.नरेन्द्र बी.चापरे सर यांनी तर आभारप्रदर्शन श्री.माणिक व्ही.रामटेके सर यांनी केले.यावेळी श्री.सुरेश एन.गजभे सौ.ज्योती जे.घोडाम,सौ.नर्मदा संजय डवरे,कु.तनुजा उमेश नंदेश्वर,दिप्ती डी.खोब्रागडे,प्रणोती प्रफुल सहारे,प्रज्ञा बागडे, अंजली पगारे आणि कर्मचारी विजया श्रीवास्तव यांनी सहकार्य केले.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …