Breaking News

*कार अपघातात एक महिला जागीच ठार*

*कार अपघातात एक महिला जागीच ठार*

रामटेक – सकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान कांद्री माईन येथे झालेल्या कार अपघातात एका दहि विकणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यु झाला .
                            

प्राप्त माहीती नुसार मृतक श्रीमती कवडाबाई चिंतामण वाघमारे वय अंदाजे 70 वर्ष मुक्काम हिवरा (बेंडे )येथील रहिवासी असुन दररोज प्रमाणे आजही दही विकुन रस्ता ओलांडत असतांना सिवनी कडून नागपूरला जाणारी कार क्र MH 31 FR 9713 नी धडक दिल्यामुळे ती जागीच ठार झाली .


                  

सदर घटना ही महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कार बैरीकेट तोडून क्षतिग्रस्त झाली अपघातामुळे रस्त्यांच्या दुतर्फा मोठी रांग लागलेली होती .घटनेची माहिती तात्काळ पोलीस स्टेशन रामटेक व टोल प्लाझा खुमारी यांना देण्यात आली.महिलेचे शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले.पुढिल तपास रामटेक पोलीस स्टेशनची  चमु करीत आहे

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …