*संघपाल सामाजिक बहुउद्देशीय संस्था द्वारे रायनगर कन्हान मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती थाटात साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान:- संघपाल सामाजिक बहुउद्देशीय संस्था द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य कार्यक्रमाचे भव्य आयोजन राय नगर बुद्धविहार येथे करण्यात आले होते. बुद्धविहार मध्ये मोठ्या संखेत राय नगर निवासी जमले असता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहरे साहेब यांनी केले . तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून व डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यर्पन करून वंदना घेण्यात आली.
तसेच कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन व पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .

गुरुवार दिनांक १४ एप्रिल २०२२ ला संघपाल सामाजिक बहुउद्देशीय संस्था द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्य भव्य रेली कार्यक्रमाचे आयोजन राय नगर बुद्ध विहार ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत रेली काढण्यात आली होती . कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित जेष्ठ नागरिक व संघपाल सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय वासुदेवजी नाईक, उपाध्यक्ष भारत पगारे, सचिव सौ. सुकेशनी बागडे, सहसचिव रींकेश चवरे, कोषाध्यक्ष सौ. प्रतिभा पाटील सदस्य मनोज मेश्राम, राहुल रामटेके, हर्ष पाटील, आशिष राऊत , सुखलाल मडावी, बाबा बर्मैया यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली असता, कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित समस्त ज्येष्ठ मान्यवरांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व पदाधिकार्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.
ह्यावेळे प्रामुख्यानी उपस्थित रोहित पाटील, धीरज नाईक, सागर उके, रोहित पाटील, बदल उके, सुजल गणवीर, सुमित घोरपडे, आयुष पाटील, पियुष भेलावे, राज्ज्त पाटील, यश डोंगरे, बिट्टू परमार, चंदन पाटील, निखील नागवंशी, सोनू नागवंशी, आसिफ शेख, स्वप्नील सूरकर, मोंटू कापसिकर, शैलेश शेळके , अनमोल भोयर , धीरज नाईक, संदीप परतेकी , सम्राट पगारे, व मोठ्या संखेनी महिला उपस्तीथ होत्या. या प्रसंगी संघपाल सामाजिक बहुउद्देशीय संस्था चे पदाधिकारी सह समस्त व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज