*कन्हान विष्णुलक्ष्मी नगर येथे नगर परिषद द्वारे पथनाट्य स्पर्धा संपन्न*
*पथनाट्यातुन स्वच्छतेची जनजागृति करुन नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावुन सांगितले*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद च्या वतीने माझी वंसुधरा अभियान व स्वच्छ भारत अभियान च्या संकल्पनेवर आधारित पथनाट्य स्पर्धा पार पाडण्यात आली .
यावेळी पथनाट्य स्पर्धेत नरसाळा व शिवाजी नगर कन्हान येथील मुला मुलींनी सहभाग घेतला असुन दोन्ही संघानी उत्कृष्ट पथनाट्य सादर केले असुन पथनाट्यातुन स्वच्छतेची जनजागृति करुन नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावुन सांगण्यात आले . ही पथनाट्य स्पर्धा आज सिहोरा येथे सकाळी ८:०० वाजता घेण्यात येणार आहे .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद नगराध्यक्षा करुणाताई आष्टणकर , उपाध्यक्ष डायनल शेंडे , नगरसेवक राजेंद्र शेंदरे , नगरसेविका अनिता पाटील , शहर समन्वयक संकेत तलेवार , नप कर्मचारी शुभम येलमुले , रविंद्र पाहुणे , शुभम काळबांडे , हरिष तिडके , व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते .
Maharashtra News Media सच की आवाज